महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर, मुलींनीच मारली बाजी, 'या' विभागाचा सर्वात कमी निकाल
मिकी घई, एबीपी माझा, पुणे May 08, 2026 02:13 PM

SSC Exam Result 2026: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (शुक्रवारी, ता ८) दुपारी १ वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर होणार आहे. राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालक गेल्या अनेक दिवसांपासून या निकालाच्या प्रतीक्षेत होते. बारावीचा निकाल (HSC Result 2026) लागल्यानंतर आज दहावीचा निकाल (SSC Result 2026)जाहीर होणार आहे. काल (गुरुवारी, ता ७) संध्याकाळी बोर्डाकडून निकालाबाबत घोषणा करण्यात आली. त्यानुसार आज दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर आणि अन्य वेबसाईटवर ऑनलाईन निकाल (SSC online result) पाहता येईल. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचे गुण दिसतील. विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिका शाळेतून मिळेल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधील विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.(Maharashtra Board Exam Latest news) बोर्डाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन दहावीच्या निकालाबाबतची माहिती दिली. राज्याचा दहावीचा निकाल ९२.०९ टक्के इतका लागला आहे. 12वी प्रमाणेच दहावीचा निकाल देखील २ टक्क्यांनी घसरला आहे. कोकण निकालाचा सर्वात अव्वल लागला आहे, कोकण विभागाचा ९७.६२ टक्के लागला आहे. छत्रपती संभाजीनगरचा निकाल सर्वात कमी लागला आहे. छत्रपती संभाजीनगरचा निकाल ८८.४१ टक्के लागला आहे, अशी माहिती त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली आहे. 

त्रिगुण कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १०वीचा निकाल विद्यार्थ्यांना सकाळी ११.३० वाजल्यापासून निकाल पाहता येणार आहे, १ वाजता विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल असं आधी बोर्डाकडून सांगण्यात आलं होतं, मात्र, अचानक वेबसाईटवरती वाढणारे ट्रॅफिक यामुळे सकाळी ११.३० वाजल्यापासून निकाल पाहता येणार असल्याचा बोर्डाचा महत्वाचा निर्णय बोर्डाकडून घेण्यात आला आहे.

SSC Exam Result 2026:  दहावीच्या निकालात पुन्हा एकदा मुलींची बाजी

मुलींची टक्केवारी ९४.९६ टक्के

मुलांची टक्केवारी: ९०.५६ टक्के

मुलींचा निकाल ९४.९६ टक्के तर मुलांची ९०.५६ टक्केवारी

SSC Exam Result 2026: विभागनिहाय आकडेवारी समोर

कोकण: ९७.६२ टक्के

पुणे: ९४.२४ टक्के

नागपूर: ८९.०७ टक्के

मुंबई: ९४.९७ टक्के

कोल्हापूर: ९५.४७ टक्के

अमरावती: ९०.५० टक्के

नाशिक: ९०.५३ टक्के

लातूर: ८८.४२ टक्के

छत्रपती संभाजीनगर: ८८.४१ टक्के

एकूण विद्यार्थ्यांची नोंदणी: १५ लाख ५५ हजार ०२६ 

उत्तीर्ण विद्यार्थी: १४ लाख २० हजार ४८६

दहावीचा निकाल इथे पाहता येणार? (Where can check SSC 10th result 2026)

SSC Result 2026 Online: दहावीचा निकाल कसा पाहाल?

वरीलपैकी कोणत्याही एका संकेतस्थळावर जा. (उदा. mahresult.nic.in). त्यानंतर  'SSC Examination March 2026 Result' या लिंकवर क्लिक करा. त्यामध्ये आवश्यक माहिती भरा. तुमचा दहावीचा सीट नंबर (Seat Number) टाका. आईचे नाव: रकान्यात तुमच्या आईच्या नावाचे पहिले नाव (Mother's First Name) इंग्रजीत टाका. निकाल पाहण्यासाठी 'View Result' बटणावर क्लिक करा.

SSC Result 2026 SMS Link: दहावीचा निकाल मोबाईल एसएमएसवर कसा पाहाल?

ऑनलाईन संकेतस्थळांशिवाय तुम्हाला दहावीचा निकाल मोबाईल एसएमएसवर ही पाहता येऊ शकतो. त्यासाठी  मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन MHSSC  Seat Number टाइप करा आणि तो 57766 या क्रमांकावर पाठवा. DigiLocker: digilocker.gov.in वर 'SSC Result' सेक्शनमधून तुमची गुणपत्रिका डाउनलोड करू शकता. वेबसाईट चालू नसेल तर: sscresult.mkcl.org किंवा  results.targetpublications.org यांसारख्या इतर वेबसाईटचा वापर तुम्ही करु शकता.

SSC Exam Rechecking: रिझल्ट रिचेकिंगला कसा टाकाल?

ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी )परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांस स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरून स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.  फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंबकरून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.