Maharashtra SSC Exam Result 2026: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. मंडळाचे अध्यक्ष त्रिभुन कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, राज्याचा एकूण निकाल 92.09 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात सुमारे 2 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी मुलांच्या तुलनेत सरस कामगिरी केली आहे. विभागीय निकालात कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
पुणे - ९४.२४ टक्के
नागपूर- ८९.०७ टक्के
संभाजीनगर- ८८.४१ टक्के
मुंबई - ९४.९७ टक्के
कोल्हापूर - ९५.४७ टक्के
अमरावती - ९०.५० टक्के
नाशिक ९०.५३ टक्के
लातूर - ८८.४२ टक्के
कोकण - ९७.६२ टक्के
दहावीच्या निकालात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे.
मुलींची उत्तीर्ण टक्केवारी: ९४.९६ टक्के
मुलांची उत्तीर्ण टक्केवारी: ९०.५६ टक्के
1. https://sscresult.mahahsscboard.in/
2. https://results.digilocker.gov.in
3. https://mahahsscboard.in
4. https://sscresult.mkcl.org
5. https://results.targetpublications.org
6. https://results.navneet.com
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीची परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी दिली आहे. त्यांना दुपारी एक वाजता निकाल उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांनी त्यांचा परीक्षा क्रमांक आणि आईचं नाव नोंदवून निकाल पाहता येईल.
स्टेप 1: mahahsscboard.in. या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
स्टेप 2: Maharashtra SSC Result 2026 ही लिंक उपलब्ध असेल त्यावर क्लिक करा
स्टेप 3: विद्यार्थ्यांनी यानंतर रोल नंबर आणि आईचं नाव नोंदवून लॉगीन करावं.
स्टेप 4: विद्यार्थ्यांनी सबमिट बटनावर क्लिक केल्यावर त्यांच्या स्क्रीनवर दहावीचा निकाल उपब्ध होईल
स्टेप 5: दहावीचा निकाल डाऊनलोड करा आणि प्रिंट काढून पुढील कामांसाठी सोबत ठेवा.
दरम्यान,दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं तात्पुरत्या स्वरुपात गुणपत्रक मिळेल. मूळ गुणपत्रक संबंधित विद्यार्थ्याच्या शाळांमध्ये मिळेल. त्यासाठीची तारीख बोर्डाकडून जाहीर केली जाईल.
ऑनलाईन संकेतस्थळांशिवाय तुम्हाला दहावीचा निकाल मोबाईल एसएमएसवर ही पाहता येऊ शकतो. त्यासाठी मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन MHSSC Seat Number टाइप करा आणि तो 57766 या क्रमांकावर पाठवा. DigiLocker: digilocker.gov.in वर 'SSC Result' सेक्शनमधून तुमची गुणपत्रिका डाउनलोड करू शकता. वेबसाईट चालू नसेल तर: sscresult.mkcl.org किंवा results.targetpublications.org यांसारख्या इतर वेबसाईटचा वापर तुम्ही करु शकता.
आणखी वाचा