DC vs KKR: दिल्ली आणि कोलकात्याची एक सारखी गत, प्लेऑफच्या शर्यतीत कोण पुढे? जाणून घ्या समीकरण
admin May 08, 2026 07:24 PM
[ad_1]

आयपीएल 2026 स्पर्धेतील 51वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. खरं तर दोन्ही संघांसाठी हा सामना म्हणजे करो या मरोची स्थिती आहे. प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी दोन्ही संघांना काहीही करून हा सामना जिंकणं भाग आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत सातव्या, तर कोलकाता नाईट रायडर्स संघ आठव्या स्थानावर आहे. आतापर्यंत कोलकता नाईट रायडर्स 9 सामने खेळले असून त्यापैकी तीन सामन्यात विजय, 5 सामन्यात पराभव आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे खात्यात 7 गुण आणि नेट रनरेट हा -0.539 आहे. तर दिल्ली कॅपिटल्सने 10 सामने खेळले असून 4 सामन्यात विजय आणि सहा सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे 8 गुण आणि -0.949 नेट रनरेटसह सातव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाला अद्याप चार सामने खेळायचे आहेत. त्यामुळे 16 गुणांचं गणित सोडवायचं असेल तर चार पैकी चार सामने जिंकणं भाग आहे. तर 16 गुण होतील आणि प्लेऑफचं गणित सुटेल. दिल्लीला चार पैकी दोन सामन्यात कठीण आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. कारण एक सामना पंजाब किंग्स विरूद्ध आणि दुसरा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्यांच्या होमग्राउंडवर होणार आहे. दोन्ही संघांनी स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे या संघांना पराभूत करण्याचं मोठं आव्हान असणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्सची सुरूवात पराभवाने झाली होती. मात्र त्यानंतर सलग तीन विजय मिळवून प्लेऑफच्या शर्यतीत आशा जिवंत ठेवल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्सला अजूनही पाच सामने खेळायचे आहेत. म्हणजेच या पाच सामन्यात विजय मिळवला तर 10 गुणांची कमाई होईल. पाच सामने जिंकताच 17 गुण होतील आणि प्लेऑफमधील जागा पक्की होईल. दोन सामने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध, तर उर्वरित तीन सामने हे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहेत. दरम्यान, अद्याप कोणताही संघ स्पर्धेतून आऊट किंवा प्लेऑफसाठी पात्र ठरलेला नाही.


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.