ती फ्रीजमध्ये सापडेल असं म्हणतात तेव्हा..; ट्रोलिंगबद्दल पहिल्यांदाच व्यक्त झाला सैराटमधला ‘सल्या’
admin May 08, 2026 07:25 PM
[ad_1]

नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. परश्या आणि आर्ची या भूमिका तर गाजल्याच, पण त्याचसोबत या दोघांच्या मित्रमैत्रिणींची भूमिका साकारणारे कलाकार आजही सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यापैकीच एक भूमिका होती सल्याची. अरबाज शेखने ‘सैराट’मध्ये परश्याचा मित्र सल्याची भूमिका साकारली होती. तो अरबाज आता मोठा झाला असून त्याने त्याच्या आयुष्याची एक नवी सुरुवात केली आहे. नुकतंच अरबाजने लग्न केलं असून पत्नीसोबतचे सुंदर फोटो त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. अरबाजने त्याची गर्लफ्रेंड सिमरनशी लग्न केलं आहे. हे दोघं गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अनेकांनी दोघांना लग्नाच्या शुभेच्छा तर दिल्या, परंतु काहींनी त्याला ट्रोलसुद्धा केलं. मुस्लीम असून हिंदू मुलीशी लग्न केल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीका केली. आता अरबाजने या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे.

एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अरबाज म्हणाला, “मी सिमरनसोबतचा फोटो पोस्ट केला तेव्हा अनेकांनी म्हटलं की ती हिंदू आहे, पंजाबी आहे. तर त्यांना मी सांगू इच्छितो की, आम्ही जात-धर्माच्या पलीकडे गेलेली लोकं आहोत. मुस्लीम म्हणून जन्माला आलो असलो तरी मनाने आम्ही मराठीसुद्धा आहोत. सिमरनसुद्धा मुस्लीमच आहे. एखादी मुलगी जेव्हा आवडते, तेव्हा आपण तिचा जात-धर्म पाहत नाही. हे सर्व काही डोक्यात नसतं. पण फ्रीजमध्ये सापडेल वगैरे असं जेव्हा लोक म्हणतात, तेव्हा खूप वाईट वाटतं. कारण सगळेच तसे नसतात.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Arbaj Shaikh (@arbajshaikh15)

याविषयी अरबाज पुढे म्हणाला, “मी घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावला तेव्हा माझ्या आईवडिलांनी कधीच त्याला विरोध केला नाही. पण लोकांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा अनेकांनी टीका केली. मला छत्रपती शिवाजी महाराज खूप आवडतात. म्हणून मी गळ्यात त्यांचा फोटो असलेला लॉकेटसुद्धा घातला होता. पण धर्म वेगळा असल्यामुळे मला खूप विरोध सहन करावा लागतो. लग्नानंतर मी आणि माझी पत्नी रायगडावरसुद्धा गेलो होते. आमचे कुटुंबीय कधीच या सर्व गोष्टींना विरोध करत नाहीत, परंतु बाहेरून मला टीकेचा सामना करावा लागतो.”


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.