TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर? अटकेनंतर धक्कादायक माहिती समोर
admin May 08, 2026 07:25 PM
[ad_1]

नाशिक येथील टीसीएस कंपनीशी संबंधित धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या निदा खानबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील कथित मास्टरमाईंड असलेली निदा खान ही दोन महिन्यांची गरोदर असल्याचे सूत्रांकडून समजते. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तिची UPT (युरिन प्रेग्नंसी टेस्ट) करण्यात आली होती. या तपासणीत ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती समोर आली आहे.
या घडामोडीनंतर पोलिसांकडून निदा खानबाबत विशेष खबरदारी घेतली जात असून, तिला लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर निदा खानने नाशिक न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळला होता. त्यानंतर आपण गर्भवती असल्याचे कारण देत तिने पुन्हा जामिनासाठी प्रयत्न केला, पण तिला दिलासा मिळाला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, निदा खान छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरात लपल्याची माहिती पोलिसांना दोन दिवसांपूर्वीच मिळाली होती. मात्र कोणतीही जोखीम टाळण्यासाठी पोलिसांनी संबंधित घराची गुप्त रेकी केली आणि त्यानंतर सापळा रचत तिला अटक केली. या प्रकरणामुळे राज्यभर मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांचा तपास अधिक वेगाने सुरू आहे.

 

 


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.