गृहकर्ज नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेनं त्यांच्या गृहकर्जदारांना मोठा धक्का दिला आहे. बँकेनं गृहकर्जाच्या दरात वाढ केली आहे. बँकेनं तीन वर्षांच्या MCLR मध्ये 0.05 टक्क्यांची वाढ केली आहे. मात्र,बँकेनं व्यवसाय कर्ज आणि गृहकर्जाशी संबंधित दर 0.05 टकक्यांनी कमी केला आहे, यामुळं येत्या काळात नवं व्यवसाय कर्ज आणि गृहकर्ज स्वस्त होऊ शकतं.
एचडीएफसी बँकेनं मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडस बेस्ड लेंडिंग रेटसमध्ये 0.05 टक्क्यांची वाढ आणि कपात दोन्ही वेगळ्या कालावधींवर केलं आहे. हे दर 7 मे पासून लागू झाले आहेत. एमसीएलआर मधील कपातीचा फायदा अशा ग्राहकांना होईल ज्यांचं कर्ज शॉर्ट- टर्म MCLR शी संबंधित आहे, त्यांना फायदा होईल. मात्र, गृहकर्जदारांना याचा फटका बसू शकतो, कारण येत्या कालावधीत त्यांचे ईएमआय वाढण्याची शक्यता आहे. MCLR म्हणजे असा व्याज दर ज्यापेक्षा कमी दरानं बँका कर्ज देऊ शकत नाहीत. आरबीआयनं एमसीएलआर प्रक्रिया 2016 पासून सुरुवात केली आहे.
गृहकर्ज काढताना सर्वात कमी व्याज दर कोणती बँक किंवा कोणती हाऊसिंग फायनान्स संस्था देतेय हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण व्याजदरातील थोडासा फरक ईएमआयच्या रकमेवर परिणाम करतो. कमी व्याजदरावर कर्ज घेतल्यास कर्जदारांना दीर्घकालीन फायदा होतो.
आरबीआयनं एप्रिल महिन्यात रेपो रेटचा दर 5.25 टक्के निश्चित केलेला आहे. गृहकर्जाचा व्याज दर रेपो रेटशी संबंधित असतो. रेपो रेट वाढल्यास गृहकर्जाचा व्याज दर वाढतो आणि रेपो रेट कमी झाल्यास गृहकर्ज कमी व्याज दरानं मिळते.
स्टेट बँक ऑफ इंडिया : 7.25 -8.95
बँक ऑफ बडोदा :7.20-9.60
यूनियन बँक ऑफ इंडिया : 7.15-9.60
पंजाब नॅशनल बँक: 7.25 – 9.30
बँक ऑफ इंडिया : 7.10 -10.25
कॅनरा बँक : 7.25 – 9.25
बँक ऑफ महाराष्ट्र : ७.१० -९.९०
पंजाब आणि सिंध बँक: 7.30- 10.70
इंडियन ओवरसीज बँक :7.10 टक्क्यांपासून
इंडियन बँक : 7.15 – 9.55
सेंट्रल बँक ऑफ इंडिया: 7.10 – 9.15
कोटक महिंद्रा बँक,आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक, एचएसबीसी बँक, साऊथ इंडियन बँक, करुर व्यस्य बँक, कर्नाटक बँक, फेडरल बँक, तामिळनाड मर्चंटाइल बँक, आरबीआएल बँक, सीएसबी बँक, सिटी यूनियन बँक या खासगी बँकांचा व्याज दर 7.20 टक्क्यांपासून 11.90 टक्क्यांदरम्यान आहे.
एलआयसी हाऊसिंग फायनान्स, बजाज हाऊसिंग फायनान्स, टाटा कॅपिटल, पीएनबी हाऊसिंग फायनान्स, जीआयसी हाऊसिंग फायनान्स, एमसएमएफजी इंडिया होम फायनान्स,सम्मान कॅपिटल, आदित्य बिर्ला कॅपिटल, आयसीआयसीआय होम फायनान्स, गोदरेज हाऊसिंग फायनान्स अशा हाऊसिंग फायनान्स कंपन्यांचे व्याज दर 7.15 टक्क्यांपासून 10 टक्क्यांपर्यंत आहेत.
आणखी वाचा