एअरटेलच्या या स्वस्त ब्रॉडबँड प्लॅनमध्ये 22हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म्स, जाणून घ्या किंमत
Tv9 Marathi May 09, 2026 11:45 AM

तुम्हाला जर नवीन ब्रॉडबँड कनेक्शन घ्याचा असेल आणि तुम्ही कोणती कंपनी यासाठी योग्य आहे हे शोधत असाल त्याचबरोबर कोणती ब्रॉडबँड कंपनी कमी किमतीत सर्वोत्तम फायदे देते हे तुम्हाला माहित असणे महत्वाचे आहे. अशातच तुम्ही घरी एअरटेलचे ब्रॉडबँड घेण्याचा विचार करत असाल, तर कंपनीकडे एक परवडणारा प्लॅन आहे, जो केवळ डेटाच नाही तर लाईव्ह टीव्ही चॅनेल्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ओटीटीचे फायदे देखील देतो. या प्लॅनची ​​किंमत फक्त 699 रुपये आहे. चला या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या ओटीटी सुविधांबद्दल जाणून घेऊयात.

आज आपण एअरटेलच्या सर्वात स्वस्त एअरफायबर प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत. जे अगदी परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध आहे. 699 रुपयांच्या या प्लॅनमध्ये स्वतंत्र जीएसटी समाविष्ट आहे. 18% जीएसटी जोडल्यानंतर, या प्लॅनची ​​किंमत तुम्हाला 824.82 रुपये होईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, तुम्ही एअरटेलचा ब्रॉडबँड प्लॅन घ्या किंवा जिओचा, प्लॅनच्या किमतीमध्ये 18% जीएसटी जोडला जात आहे.

एअरटेलच्या 699 रुपयांच्या प्लॅनची माहिती

टेलिकॉमटॉकनुसार, एअरटेलच्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये 40 Mbps स्पीड आणि दरमहा 1 TB डेटा मिळतो. तर एअरफायबर प्लॅनमध्ये 1 TB डेटा, तर फायबर प्लॅनमध्ये 3.3 TB डेटा मिळतो. एवढेच नाही तर या एअरटेल एअरफायबर प्लॅनमध्ये डिझ्नी+ हॉटस्टार, सनएनएक्सटी, सोनी लिव्ह, आहा, चौपाल आणि इरोस नाऊ यांसारखे OTT फायदेही मिळतात. OTT व्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये 350 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्सचा ॲक्सेस देखील मिळतो.

हाय-स्पीड प्लॅन

तुम्हाला जर 40Mbps चा वेग अपुरा वाटत असेल, तर कंपनी तुमच्यासाठी 799 रुपये किमतीचा 100Mbps चा प्लॅन देखील उपलब्ध करून देते. GST नंतर या प्लॅनची ​​किंमत 942.82 रुपये होते. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की या प्लॅनमध्ये OTT लाभांचा समावेश नाही. OTT लाभांचा फायदा घेण्यासाठी, तुम्हाला 899 रुपयांचा प्लॅन निवडावा लागेल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.