फ्लिपकार्टपासून ॲमेझॉनपर्यंत मदर्स डे निमित्त या गॅजेट्सवर मिळत आहे आकर्षक ऑफर्स
Tv9 Marathi May 09, 2026 10:45 PM

आपल्या आयुष्यात आईचे स्थान इतके महत्वाचं आहे की त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही. तर प्रत्येक आईसाठी प्रत्येक दिवस हा खास असतो, तिला कोणत्याही खास दिवसाची गरज नसते. पण अशातच जेव्हा मदर्स डेचा विचार येतो तेव्हा आपल्या आईसाठी काहीतरी खास करावं असं प्रत्येकाला वाटतं. तर यावर्षी मदर्स डे हा 10 मे 2026 म्हणजेच उद्या साजरा केला जाणार आहे. अशातच या मदर्स डेला तुम्हाला तुमच्या आईसाठी काही खास भेटवस्तू देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अशा काही गॅजेट्सबद्दल जाणून घ्या जे देताच आईच्या चेहऱ्यावर हास्य येईल. तर या मदर्स डे निमित्त फ्लिपकार्टपासून ॲमेझॉनपर्यंत या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर काही गॅझेटवर उत्तम डिस्काउंट देण्यात येत आहे. चला याबद्दल आजच्या लेखात जाणून घेऊयात.

boAt स्मार्ट रिंग: 2026 च्या मदर्स डे निमित्त boAt ची स्मार्ट रिंग ॲमेझॉनवर 65% सवलतीसह 3 हजार 499 रूपयांमध्ये तुम्हाला खरेदी करता येणार आहे. तुम्ही ही रिंग ब्लॅक आणि रोझ गोल्ड या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकता. ही अँड्रॉइड आणि आयओएस (iOS) सोबत सुसंगत आहे. ॲमेझॉनच्या सूचीनुसार एकदा चार्ज केल्यावर याची बॅटरी 5 दिवसांपर्यंत चालते. यामध्ये स्टेप काउंट, हार्ट रेट मॉनिटर, स्क्रॅच रेझिस्टन्स, स्लीप मॉनिटर, डिस्टन्स ट्रॅकर आणि ॲक्टिव्हिटी ट्रॅकर यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

युरेका फोर्ब्स रोबोटिक फ्लोअर क्लीनर: हा रोबोट क्लीनर तुमचे घर स्वच्छ ठेवण्यास मदत करू शकतो. यामध्ये स्मार्ट ॲप कंट्रोल्स, LiDAR 3.0 टेक्नॉलॉजी, व्हॉइस कंट्रोल, गूगल असिस्टंट आणि अलेक्सा सपोर्ट, तसेच खोलवर स्वच्छता करण्यासाठी टर्बो सक्शन पॉवर आहे. याव्यतिरिक्त हा रोबोट क्लीनर वेट मॉपिंगचे कामही करू शकतो. हे स्मार्ट गॅझेट एकदा चार्ज केल्यावर 3 तासांपर्यंत चालते. 31% सवलतीनंतर हे उत्पादन 17 हजार 999 रूपयांमध्ये तुम्हाला खरेदी करता येणार आहे.

डायसन सुपरसॉनिक हेअर ड्रायर: तुम्हाला जर तुमच्या आईला हेअर ड्रायर भेट द्यायचा असेल, पण हीटमुळे केस खराब होण्याची भिती वाटत असेल तर या डायसन उत्पादनाचा विचार करा, कारण कंपनीचा दावा आहे की हे हेअर ड्रायर हीट-कंट्रोल आहे. 7 स्टायलिंग, 3 स्पीड आणि 3 हीट सेटिंग्ससह येणाऱ्या या मॉडेलमध्ये इंटेलिजेंट हीट कंट्रोलसारखी वैशिष्ट्ये आहेत. 34% सवलतीनंतर, हे हेअर ड्रायर 24 हजार 402 रूपयांना तुम्ही खरेदी करू शकता.

नॉईज दिवा स्मार्टवॉच: जर तुम्ही 3 हजारच्या बजेटमध्ये स्मार्टवॉच भेट म्हणून देण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला हे घड्याळ आवडेल. 50% सवलतीनंतर हे घड्याळ ॲमेझॉनवर 2 हजार 999 रूपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. AMOLED डिस्प्ले, महिलांसाठी सायकल ट्रॅकर, 100 हून अधिक वॉच फेसेस आणि 4 दिवसांपर्यंतची बॅटरी लाईफ यांसारखी वैशिष्ट्ये यात आहेत.

सॅमसंग इअरबड्स: तुम्ही जर उत्तम दर्जाचे इअरबड्स भेट म्हणून तुमच्या आईला देण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही फ्लिपकार्टवर हे सॅमसंग-ब्रँडेड इअरबड्स 40% सवलतीसह 5 हजार 999 रूपयांमध्ये मिळवू शकता. या 4-स्टार-रेटेड इअरबड्समध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट, नॉईज कॅन्सलेशन, दमदार बास आणि खोल आवाजासाठी 6.5 मिमी ड्रायव्हर्स आणि 10-मीटर ब्लूटूथ रेंज आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.