तीन दिवसांच्या नाट्यमय वळणानंतर थलपती विजय यांचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला! बहुमत सिद्ध करण्याची तारीख सुद्धा ठरली
परशराम पाटील, एबीपी माझा May 10, 2026 12:13 AM

Thalapathy Vijay: तामिळनाडूमध्ये, टीव्हीकेचे प्रमुख सी. जोसेफ विजय उद्या (10  मे) रविवारी राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. नवीन सरकारचा शपथविधी सोहळा चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये सकाळी 10 वाजता सुरू होईल. विजय यांनी लोक भवन येथे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्यासाठी 121 आमदारांची पाठिंब्याची पत्रे सादर केली. बहुमत सिद्ध करण्यासाठी 118 आमदारांच्या बहुमताची आवश्यकता होती. 13 मे रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागेल. 

व्हीसीके आणि आययूएमएलने पाठिंबा दिला

4 मे रोजी जाहीर झालेल्या निवडणुकीच्या निकालांनुसार, विजय यांच्या पक्षाने सर्वाधिक 108 जागा मिळवल्या होत्या, परंतु बहुमतासाठी त्यांना 10 जागा कमी पडल्या. 8 मे पर्यंत, टीव्हीकेने काँग्रेसच्या पाच आमदारांचा आणि सीपीआय व सीपीआय(एम)च्या प्रत्येकी दोन आमदारांचा पाठिंबा मिळवला होता. आज (9 मे) व्हीसीके आणि आययूएमएलने प्रत्येकी दोन आमदारांसह टीव्हीकेला आपला पाठिंबा दर्शवला. महाबलीपुरम येथील फोर पॉइंट्स रिसॉर्टबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे, जिथे टीव्हीकेचे सर्व आमदार थांबले आहेत.

गेल्या आठवड्यापासून काय घडलं?

4 मे: 108 आमदारांसह टीव्हीके सर्वात मोठा पक्ष बनला

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, ज्यात विजय यांच्या पक्षाने एकूण 234 पैकी सर्वाधिक 108 जागा जिंकल्या. डीएमकेने 59, तर एआयएडीएमकेने 47 जागा जिंकल्या. लहान पक्ष आणि इतरांना 20 जागा मिळाल्या. सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेले 118 सदस्यांचे बहुमत कोणालाही मिळवता आले नाही.

5 मे: काँग्रेसचा पाठिंबा, आमदारांची संख्या 113 वर पोहोचली

काँग्रेसने डीएमकेसोबतची युती तोडून टीव्हीकेला पाठिंबा जाहीर केला. काँग्रेसच्या नेत्यांनी टीव्हीकेच्या कार्यालयाला भेट देऊन विजय यांना पाठिंब्याची पत्रे सादर केली. यामुळे आमदारांची संख्या 113 झाली, परंतु बहुमतासाठी त्यांना अजून पाच जागा कमी होत्या.

6 मे: राज्यपालांची भेट, पण बहुमत नाही

अभिनेता विजय सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडे गेला, पण बहुमताची अट पूर्ण होत नसल्याचे सांगून राज्यपालांनी त्याचा दावा फेटाळला.

7 मे: डाव्या पक्षांचा समावेश, आमदारांची संख्या 117 वर पोहोचली

डाव्या पक्षांनी, सीपीआय आणि सीपीआय(एम)ने, प्रत्येकी दोन आमदारांसह टीव्हीकेला पाठिंबा जाहीर केला. विजय यांनी सलग दुसऱ्या दिवशी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांनी पुन्हा 1118 आमदारांच्या पाठिंब्याची मागणी केली. थोडा वेळ घेऊन विजय परतला.

8 मे: व्हीसीकेचा पाठिंबा, संध्याकाळी नकार

विजयच्या टीव्हीके पक्षाने व्हीसीकेकडून पाठिंब्याचा दावा केला. संध्याकाळी, विजय यांनी सलग तिसऱ्या दिवशी पुन्हा राज्यपालांशी संपर्क साधला, पण व्हीसीकेने रात्री उशिरापर्यंत पाठिंब्याची पुष्टी केली नाही. प्रकरण गुंतागुंतीचे झाले. शपथविधी सोहळा पुन्हा पुढे ढकलण्यात आला.

9 मे: आययूएमएल-व्हीसीके सामील, आमदारांची संख्या 121 वर पोहोचली

आययूएमएल आणि व्हीसीकेने टीव्हीकेला पाठिंबा दिला. यापूर्वी दोन्ही पक्षांनी त्यांना पाठिंबा देण्यास नकार दिला होता. यामुळे 7 आणि 9 मे रोजी होणारा विजय यांचा शपथविधी सोहळा पुढे ढकलण्यात आला होता. चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममधून विजय यांचे हजारो चाहते निराश होऊन परतले होते. त्यांच्या पाठिंब्याने आमदारांची संख्या आता 121 झाली आहे, जी बहुमताच्या 118 पेक्षा 3 ने जास्त आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.