मुख्यमंत्री बनणार हे आधीच माहिती होतं? थलपती विजयच्या गाडीच्या नंबरची देशभरात चर्चा
Tv9 Marathi May 10, 2026 12:45 AM

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेता थलपती विजयने शानदार कामगिरी करत 108 जागा जिंकल्या आहेत. यासह विजयचा टीव्हीके हा पक्ष सर्वात निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. आता तब्बल 5 दिवसांनंतर थलपती विजयचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. बहुमताचा आकडा गाठण्यात टीव्हीकेला यश आले आहे. आता विजय रविवारी सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. निवडणुकीत विजय मिळवल्यापासून विजयची सोशल मीडियावर चर्चा आहे. अशातच आता विजयच्या गाडीचा नंबरही चर्चेत आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कारचा नंबर चर्चेत

थलपती विजयशी संबंधित जुन्या-नव्या चित्रपटांचे अनेक व्हिडिओ क्लिप्स इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. त्यापैकी सर्वात चर्चेत असलेला व्हिडिओ म्हणजे त्यांच्या द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम या चित्रपटातील आहे. 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील एका दृश्यात विजय कारवर बसलेले दिसतात. त्या कारचा नंबर आहे – TN 07 CM 2026. म्हणजे 2026 मध्ये तामिळनाडूचा मुख्यमंत्री. यातून विजय यांनी मोठे संकेत दिल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री बनणार हे विजय यांनी आधीच माहिती होतं?

हा व्हिडिओ त्यांच्या पक्षाने निवडणूक प्रचार सुरू केल्यापासूनच सोशल मीडियावर व्हायरल होत होता. मात्र आता निवडणुकीत अनपेक्षित विजय मिळाल्यानंतर आता ते मुख्यमंत्री बनणार आहेत. त्यामुळे विजयला आपण मुख्यमंत्री बनणार हे आधीच माहिती होते? अशी चर्चा सुरू झाली आहे. अनेक जणांचे म्हणणे आहे की या चित्रपटातील सीनने आधीच विजय मुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत दिले होते.

विजय थलपति के GOAT फ़िल्म के इस दृश्य में कार का नंबर है:- TN 07 CM 2026!

गौर से देखिए नंबर को
TN (तमिलनाडू)..CM 2026… मुख्यमंत्री 2026

क्या अद्भुत संयोग है। pic.twitter.com/7ZZfvzHlEi

— Jeetu Besla (@JeetuBesla)

पक्ष स्थापनेनंतर काही महिन्यांतच चित्रपट रिलीज

द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम हा चित्रपट विजय यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये आपल्या तामिळला वेट्टारी काझगम (TVK) पक्षाची स्थापना केल्यानंतर काही महिन्यांतच प्रदर्शित झाला होता. त्यावेळीच विजय 2026 विधानसभा निवडणूक लढवू शकतात, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर विजय यांनी राजकारणात उतरत अभुतपूर्व यश मिळवले आहे. त्यानंतर आता हा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.