आयपीएल 2026 स्पर्धेतली 52 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने बाजी मारत राजस्थानला नमवलं. या सामन्यात नाणेफेकीचा कौल राजस्थान रॉयल्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण गोलंदाजीत फार काही प्रभाव टाकता आला नाही आणि गुजरात टायटन्सच्या फलंदाजांनी त्याचा फायदा घेतला. गुजरात टायनटन्सने 20 षटकात 4 गडी गमवून 229 धावा केल्या. तसेच विजयासाठी 230 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरूवात काही चांगली झाली नाही. पावर प्लेमध्ये वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल बाद झाला. त्यामुळे धावगतीला ब्रेक लागला. राजस्थान रॉयल्स 20 षटकात धावा करू शकला. हा सामना राजस्थान रॉयल्सने 77 धावांनी जिंकला. या विजयासह गुजरात टायटन्सने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. गुजरात टायटन्सने 11 सामन्यात 7 विजयासह 14 गुणांची कमाई केली आहे. आता प्लेऑफच्या दृष्टीने एक विजय दूर आहे. उर्वरित तीन पैकी एका सामन्यात विजय मिळवलं की झालं.
गुजरात टायटन्सकडून कर्णधार शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी चांगली सुरूवात केली. पहिल्या विकेटसाठी 118 धावांची भागीदारी केली. साई सुदर्शन 36 चेंडूत 55 धावा करून बाद झाला. तर शुबमन गिलने 44 चेंडूत 84 धावांची खेळी केली. जोस बटलरने 10 चेंडूत 13, जेसन होल्डरने 7 चेंडूत 7 धावा करून बाद झाले. तकर वॉशिंग्टन सुंदर 20 चेंडूत 37 धावा करून नाबाद राहिला. तर राहुल तेवतियाने 4 चेंडूत 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 14 धावांची खेळी केली. राजस्थानकडून ब्रिजेश शर्माने 2, तर यश राज पुनिया आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी 1 गडी बाद केला.
गुजरात टायटन्सने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरूवात काही चांगली झाली नाही. यशस्वी जयस्वाल 3 धावा करून बाद झाला. वैभव सूर्यवंशीने आक्रमक फटकेबाजी केली. त्याने 16 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकार मारत 36 धावा केल्या आणि बाद झाला. त्यानंतर आलेला शिमरोन हेटमायरही काही खास करू शकला नाही. त्याने 7 चेंडूत 6 धावा केल्या आणि तंबूत परतला. ध्रुव जुरेल 24 धावा, डोनोवन फरेरा 4 धवा, शुभम दुबे 15 धावांवर बाद झाले. रवींद्र जडेजाची खेळीही फार लांब चालली नाही आणि 38 धावांवर खेळ आटोपला. जोफ्रा आर्चर 5, दासुन शनाका 16 आणि तुषार देशपांडे 1 धाव करून बाद झाला.