How Gujarat Titans win affected RCB and PBKS in IPL 2026 ? इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये दमदार खेळ करणाऱ्या राजस्थान रॉयल्सने स्वतःसाठी खड्डा खणला आहे. मागील पाच सामन्यांत त्यांना केवळ दोन विजय मिळवता आले आणि आज ते पुन्हा हरले. तेच गुजरात टायटन्सने सलग चौथ्या विजयाची नोंद करताना प्ले ऑफच्या शर्यतीत थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. GTने १४ गुणांसह पंजाब किंग्स व गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूलाही धक्का दिला. RR ची पाचव्या स्थानी घसरण झाली.
साई सुदर्शन ( ५५) आणि शुभमन गिल ( ८४) यांनी पहिल्या विकेटसाठी ११८ धावा जोडून गुजरातला चांगली सुरुवात करून दिली. पण, मधल्या षटकांत जॉस बटलर ( १३), जेसन होल्डर ( ७) यांनी निराश केले. वॉशिंग्टन सुंदर ( ३७) व राहुल तेवातिया ( १४) यांनी संघाला ४ बाद २२९ धावांपर्यंत पोहोचवले. प्रत्युत्तरात वैभव सूर्यवंशीने ( Vaibhav Sooryavanshi) आक्रमक सुरुवात करताना १६ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ३६ धावा चोपल्या. या तीन षटकारांनी त्याने मोठे विक्रम नोंदवले.
RR vs GT Live : आशिष नेहराने खुणावलं... मोहम्मद सिराजने अगदी तसं केलं... वर्ल्ड रेकॉर्ड करणारा वैभव सूर्यवंशी असा फसला Videoमोहम्मद सिराजने वैभवला तिसऱ्या षटकात माघारी पाठवले. त्यानंतर कागिसो रबाडाने यशस्वी जैस्वाल ( ३) व शिमरॉन हेटमायर ( ६) यांना बाद केले. राशिद खान याने आठव्या षटकात ध्रुव जुरेल ( २४) व डोनोव्हन फरेरा ( ४) यांचा त्रिफळा उडवला. राशिद इथेच थांबला नाही.. त्याने शुभम दुबेलाही १५ धावांवर त्रिफळाचीत केले. रवींद्र जडेजा एका बाजूने खिंड लढवत होता, परंतु १४ व्या षटकात राशिदने त्यालाही माघारी पाठवले. जड्डूने २५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३८ धावा केल्या.
राशिदने ४-०-३३-४ अशी स्पेल संपवली. राशिदने गुजरातच्या गोलंदाजांसाठी फार काही करण्यासारखं ठेवलं नव्हतं. जेसन होल्डरने जोफ्रा आर्चर ( ५) , दासून शनाका ( १६) व तुषार देशपांडेला बाद करून गुजरातला ७७ धावांनी विजय मिळवून दिला. राजस्थनचा संघ १६.३ षटकांत १५२ धावांत तंबूत परतला.
RR vs GT Live : छोटी हाईट, वातावरण टाईट! वैभव सूर्यवंशीने मोडला विराट, सूर्या, श्रेयस अन् ख्रिस गेलचा विक्रम; बनतोय नवा 'हिटमॅन' IPL 2026 playoff scenario after RR vs GT matchसनरायझर्स हैदराबादने १४ गुणांसह आपले अव्वल स्थान कायम राखले असले तरी गुजरात टायटन्स १४ गुणांसह थेट दुसऱ्या स्थानी पोहोचले आहेत. १३ गुण असलेल्या पंजाब किंग्सची व १२ गुण असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. राजस्थान रॉयल्सचा हा ११ सामन्यांतील पाचवा पराभव ठरला आणि त्यांना प्ले ऑफसाठी आता उर्वरिती ३ सामने जिंकायला हवेत. त्याशिवाय त्यांच्यासमोर आता पर्याय नाही.