IPL 2026 Point Table: राजस्थान रॉयल्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? SRH, KKR, CSK कडून हवीय मदत... जाणून घ्या गमतीदार गणित
esakal May 10, 2026 03:45 AM

How Rajasthan Royals can qualify for IPL 2026 playoffs? गुजरात टायटन्ससाठी इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील शनिवारी एक अत्यंत महत्त्वपूर्ण विजय ठरला. त्यांनी जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सवर पूर्णपणे वर्चस्व गाजवताना ७७ धावांनी बाजी मारली आणि गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या दणदणीत विजयासह गुजरातने त्यांचा नेट रन रेन ०.२२८ असा सुधारला आणि थेट सनरायझर्स हैदराबादला ( १४ गुण) टक्कर द्यायला पोहोचले. RR ची पाचव्या स्थानावर घसरण झाली आणि आता त्यांना प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी SRH, KKR व CSK च्या मदतीची गरज आहे.

GT चे सलामीवीर साई सुदर्शन ( ५५) व शुभमन गिल ( ८४) यांनी आपल्या प्रवाही अर्धशतकांसह डावाचा भक्कम पाया रचला आणि अगदी सुरुवातीपासूनच सामन्याचा वेग निश्चित केला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर ( ३७) आणि राहुल तेवतिया ( १४) यांनी डावाच्या अखेरीस दिलेल्या मोलाच्या योगदानामुळे पाहुण्या संघाने २२९ धावांचे विशाल लक्ष्य उभे केले. याला प्रत्युत्तर देताना, वैभव सूर्यवंशीने केलेल्या (३३) आक्रमक आणि छोटेखानी खेळीचा अपवाद वगळता, राजस्थानला या पाठलागात कधीच अपेक्षित गती पकडता आली नाही. रशीद खानने आपल्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर चार बळी घेत सामन्याचे चित्र निर्णायकपणे पालटून टाकले. जेसन होल्डरनेही आपल्या प्रभावी गोलंदाजीने तीन बळी मिळवले आणि अखेरीस, रॉयल्सचा ७७ धावांनी दारुण पराभव झाला.

IPL 2026 Playoff Scenario: राजस्थान रॉयल्सने स्वतःसाठी खड्डा खणला... गुजरात टायटन्समुळे Point Table फिरला; PBKS, RCB ला धक्का कर्णधार यशस्वी जैस्वाल काय म्हणाला?

सामन्यानंतर यशस्वी जैस्वालने सांगितले की, आम्ही फक्त 'चांगल्या टप्प्यावर' गोलंदाजी करण्यावर लक्ष केंद्रित करत होतो आणि ते फलंदाजीही खूप चांगली करत होते. त्यामुळे, त्यांच्याकडून चौकार किंवा मोठे फटके कसे रोखता येतील, याचाच आम्ही विचार करत होतो. आम्ही नक्की काय अधिक चांगले करू शकतो याचा आम्ही नक्कीच आढावा घेऊ; तसेच या सामन्यातून काय शिकता येईल आणि पुढील सामन्यात आम्ही काय सुधारणा करू शकतो, यावरच आता आमचे लक्ष असेल.

RR playoff scenario after loss against Gujarat Titans

IPL 2026 Point Table मध्ये सनरायझर्स हैदराबाद व गुजरात टायटन्स प्रत्येकी ११ सामन्यांनंतर १४ गुणांसह अव्वल दोन स्थानावर आहेत. हैदराबादचा नेट रन रेट ( ०.७३७) हा गुजरातपेक्षा ( ०.२२८) चांगला आहे. पंजाब किंग्स १० सामन्यांत १३ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १० सामन्यांत १२ व राजस्थानने ११ सामन्यांत १२ गुण कमावले आहेत. राजस्थानला आता उर्वरित तीन सामन्यांत विजय मिळवावा लागणार आहे. RR चा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्स ( १७ मे), लखनौ सुपर जायंट्स ( १९ मे) व मुंबई इंडियन्स ( २४ मे) यांच्याविरुद्ध होणार आहे. हे तिन्ही संघ जवळपास स्पर्धेबाहेर गेले आहेत आणि त्यामुळे RR ला विजय मिळवायला काही अडचण यायला नको.

RR vs GT Live : आशिष नेहराने खुणावलं... मोहम्मद सिराजने अगदी तसं केलं... वर्ल्ड रेकॉर्ड करणारा वैभव सूर्यवंशी असा फसला Video

पण, त्याचवेळी राजस्थानला SRH, KKR, CSK कडून मदत हवी आहे. गुजरात टायटन्सला त्यांच्या उर्वरित ३ सामन्यांत हैदराबाद ( १२ मे), कोलकाता ( १६ मे) व चेन्नई ( २१) यांच्याविरुद्ध खेळायचे आहेत. हे तिन्ही सामने गुजरातने गमावल्यास ते १४ गुणांवर अडकतील आणि राजस्थान उर्वरित तीन सामने जिंकून १८ गुणांसह प्ले ऑफपर्यंत पोहोचतील. दोन सामने जिंकले तरी RR कडे १६ गुणांसह संधी असेल, परंतु नेट रन रेट महत्त्वाची भूमिका बजावेल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.