Marathi Rashi Bhavishya : आज 10 मे 2026चा दिवस सगळ्या राशींना संमिश्र जाणार आहे. आज चंद्र कुंभ राशीत संक्रमण करणार असून अनेक राशींना सोशल नेटवर्कमध्ये फायदा होणार आहे. वृषभ राशीमध्ये शुक्र असल्यामुळे सुख सुविधांवर तुमचा खर्च आणि गुंतवणूक होईल. जाणून घेऊया आजच्या दिवसाचे आर्थिक आणि करिअर राशिभविष्य.
मेष रास :
आर्थिक : आज तुम्ही तुमच्या बळावर नवीन आर्थिक स्रोत निर्माण कराल. चंद्रामुळे तुम्हाला लाभ होईल. त्यामुळे तुम्हाला धनप्राप्तीचे योग आहेत. बाराव्या घरात मंगळ आणि शनीच्या उपस्थितीमुळे खर्चात वाढ होईल. अनावश्यक खर्च टाळा. गुंतवणूक करताना सतर्क राहा.
करियर : आज सकाळचा वेळ तुमच्यासाठी उत्तम असेल. अडकलेली काम पूर्ण होईल. चंद्राचे दहाव्या घरात असणं तुमचा मानसन्मान वाढवेल. दुपारी टीमवर्क आणि नेटवर्किंगवर लक्ष द्या. नवीन प्रोजेक्ट मिळतील. गैरसमज वाढण्याची शक्यता आहे.
वृषभ रास :
आर्थिक : गुरूच्या कृपेने आर्थिक स्थिरता आणि योग्य निर्णय घ्याल. व्यापारात फायदा होईल. बाराव्या भावातील प्रभावामुळे नवीन खर्च समोर येतील. अनावश्यक खरेदी करू नका. विचार करून गुंतवणूक करा. घाईत निर्णय घेणे टाळा.
करिअर : सकाळचा वेळ नवीन योजना आणि नवीन लक्ष्य निर्धारित करण्यात खर्च करा. नवीन जबाबदाऱ्या मिळतील. दहाव्या भावातील राहू तुम्हाला नवीन संधी घेऊन येईल. पण कोणताही शॉर्टकट घेऊ नका. नेटवर्किंगमध्ये प्रगती होईल.
मिथुन रास :
आर्थिक : सकाळी आठव्या भावातील प्रभावामुळे तुमच्या खर्चात वाढ होईल. एखादी आर्थिक समस्या उभी राहील. गुंतवणूक जपून करा. तुमच्या राशीत असलेल्या बृहस्पतीमुळे तुम्ही योग्य निर्णय घ्याल. बाराव्या भावातील शुक्र तुम्हाला सुख सुविधांवर खर्च करण्यास भाग पाडेल. बजेटकडे लक्ष द्या.
करियर : कामात काहीतरी अडथळे येऊ शकतात. चंद्राच्या कुंभ राशीतील प्रवेशामुळे मानसिकरीत्या स्थिर असाल. नवीन स्किल शिकाल. दहाव्या भावातील मंगळ आणि शनीच्या युतीमुळे कठोर परिश्रम करावे लागतील. अधिकाऱ्यांशी वाद घालू नका.
कर्क रास :
आर्थिक : आठवा भाव सक्रिय झाल्यामुळे खर्चात वाढ होईल. सट्टेबाजी किंवा जोखमीच्या गुंतवणुकी टाळा. अकराव्या घरातील शुक्रामुळे मित्र तुम्हाला लाभ मिळवून देतील. गुरूच्या प्रभावामुळे यात्रा किंवा धार्मिक कार्यात खर्च होईल.
करियर : दहाव्या भावातील सूर्यामुळे करियरकडे गंभीरपणे लक्ष द्याल. मान सन्मान मिळेल. मेष राशीत बुधाचा अस्त झाल्यामुळे गैरसमजाचे बळी पडाल. महत्त्वाची कागदपत्रे नीट वाचा. एखादा महत्त्वाचा निर्णय घाईत घेऊ नका.
सिंह रास :
आर्थिक : उत्पन्नात वाढ होईल. सहकाऱ्यांची मदत होईल. शुक्रामुळे करिअरमध्ये प्रगती होईल. मंगळ आणि शनी आठव्या भावात असल्यामुळे खर्चात वाढ होईल. गुंतवणुकीच्या योजनेत सावधगिरी बाळगा.
करियर : तुम्ही अत्यंत प्रभावीओपने काम कराल. सगळ्यांची साथ मिळेल.
कन्या रास :
आर्थिक : दहाव्या घरात असलेल्या गुरूमुळे आर्थिक योजनांचा लाभ होईल. शुक्रामुळे भाग्यात वाढ होईल. सहाव्या घरामुळे आरोग्य आणि दैनंदिन खर्चात वाढ होईल. अनावश्यक खर्च करू नका. बचत करा.
करियर : भविष्याच्या नियोजनासाठी उत्तम दिवस आहे. योजनेची अंमलबजावणी करा. कामं अत्यंत कार्यक्षमतेने पूर्ण कराल. काम तपासून घ्या. कोणाशीही वाद घालू नका..
तूळ रास :
आर्थिक :शुक्राची उपस्थिती आर्थिक चढउतार किंवा अनपेक्षित खर्च होतील. जोखमीच्या गुंतवणुकी करू नका. नवव्या घरातील गुरूमुळे दीर्घकालीन लाभ होतील.
करियर : वैयक्तिक गोष्टींवर लक्ष असल्यामुळे कामात दुर्लक्ष होईल. भागीदारीतील साथ मिळेल पण टीमवर्कची गरज आहे.
वृश्चिक रास :
आर्थिक : आठव्या घरातील गुरूमुळे आर्थिक बदल होतील. व्यवसाय किंवा वाटाघाटींमधून लाभ मिळेल. सातव्या घरात शुक्र असल्यामुळे भागीदारीतून लाभ होईल. घरासंबंधी खर्च महागडे ठरतील. बचत करा.
करियर : काम वेळेवर पूर्ण कराल. पण संवादात अडचणी येतील. एकाग्रता टिकवून ठेवा.
धनु रास :
आर्थिक : आर्थिक नियोजन आणि बचत कराल. आर्थिक स्थैर्य मिळेल. घरातील वस्तूंवर खर्च होईल. शिस्त पाळा. घाईने निर्णय घेऊ नका.
करियर : आर्थिक प्रक्रियेसाठी दिवस उत्तम आहे. संपर्क वाढतील. मार्केटिंग, लेखन क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी उत्तम दिवस आहे.
मकर रास :
आर्थिक : कर्जाच्या व्यवस्थापनेकडे लक्ष द्याल. नवीन बचत किंवा गुंतवणूक कराल. पाचव्या घरातील शुक्रामुळे सृजनशील कार्यांमधून लाभ मिळेल, परंतु सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कठोर मेहनत घ्यावी लागेल.
करियर : आर्थिक बाबींकडे लक्ष केंद्रित कराल. घर आणि कामाच्या ठिकाणी संतुलन साधाल. बुधाच्या अस्तामुळे गोंधळ निर्माण होईल.
कुंभ रास :
आर्थिक : आर्थिक दबाव अनुभवलं. खर्चांमुळे थोडे चिंतीत असाल. आर्थिक निर्णयांवर नियंत्रण ठेवलं. अनावश्यक खर्च टाळा.
करियर : एकाग्रता टिकवून ठेवण्यास अडचण येईल. मोठे निर्णय घेणे टाळा. कामं प्रभावीपणे हाताळलं.
मीन रास :
आर्थिक : सकाळी सामाजिक संपर्क आणि नेटवर्किंगमुळे फायदा होऊ शकतो. तथापि, दुपारी १२व्या घरामुळे अनावश्यक खर्च होतील. आर्थिक गोंधळ निर्माण होऊ शकतो. बचतीकडे लक्ष द्या.
करियर : सहकाऱ्यांचा पाठींबा मिळेल. एकट्याने काम कराल. संभाषण करताना खटके उडू शकतात त्यामुळे शब्द जपून वापरा.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.