Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. पुणे ते मुंबई महामार्गावर प्रवास करत असताना एका वाहनाने सुळे यांच्या कारला धडक दिली आहे. या घटनेनंतर सुप्रिया सुळे यांनी घडलेला प्रसंग सोशल मीडियावर शेअर केल आहे. तसेच त्यांनी ज्या वाहनाने त्यांच्या कारला धडक दिली त्या वाहनाचा नंबर देखील शेअर केला आहे. नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ते पाहुयात.
While travelling from Pune to Mumbai today, I had an awful experience on the highway when vehicle GJ13CF5257 rammed into my car from the side due to reckless driving. Thankfully, everyone is safe.
— Supriya Sule (@supriya_sule) May 9, 2026
Incidents like these are a serious reminder that overspeeding and negligence on… pic.twitter.com/WrOGsNzqLX
आज पुणे ते मुंबई प्रवास करत असताना, महामार्गावर GJ13CF5257 या वाहनाने बेदरकारपणे गाडी चालवल्यामुळं माझ्या गाडीला बाजूने धडक दिल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. हा एक अत्यंत वाईट अनुभव होता. सुदैवाने, आम्ही सर्वजण सुरक्षित आहेत अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. अशा घटना हा एक गंभीर इशारा आहे. अतिवेग आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळं असंख्य लोकांचे जीव धोक्यात येऊ शकतात. सीट बेल्ट लावा, सतर्क राहा आणि जबाबदारीने वाहन चालवा, जेणेकरुन आपले महामार्ग सर्वांसाठी अधिक सुरक्षित होतील असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. दरम्यान, पुणे ते मुंबई प्रवास करत असताना चालक आणि सुळे हे दोघेच गाडीत होते. आम्ही दोघेही सुरक्षीत असल्याची माहिती सुळे यांनी दिली आहे.
दरम्यान, मुंबई पुणे महामार्गावर अनेक अपघात होत असतात. अनेकदा यात मोठी जीवितहानीही देखील पाहायला मिळालेली आहे. अनेकदा असे अपघात हे वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे होत असतात. त्यामुळेच या अपघातानंतर आता सुप्रिया सुळे यांनी वाहने सावकाश चालवण्याचे व वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. या अपघातात सुप्रिया सुळे यांच्या गाडीचे थोडे नुकसानही झाल्याची माहिती समोर आली आहे.