फिरस्ती – शौर्य आणि त्यागाची कथा
Marathi May 10, 2026 12:25 PM

>> प्रांजल वाघ, [email protected]

बेळगाव शहराच्या आग्नेयास 53 किमी अंतरावर, पुणे-बंगळुरू महामार्गावर कित्तूर हे शहर वसलेलं आहे. याच शहरात राणी चेन्नम्मा आणि संगोळळी रायणणा यांच्या शौर्याची व त्यागाची कथा सांगत उभा आहे कित्तूरचा भुईकोट!

साधारण 1660-91 च्या सुमारास कित्तूर राजघराण्याच्या पाचव्या राजाने अल्लप्पा गौडा सरदेसाई यांनी हा किल्ला बांधून काबाहेरील तटबंदी, मुख्य किल्ल्याभोवती असलेला खंदक आणि मुख्य किल्ला अशी रचना इथे आभारतीय आणि इस्लामिक शैलीचा इथे मिलाफ आपल्याला दिसून येतो. किल्ल्याच्या आत राजमहाल आहे. त्यात राजदरबार, राजा-राणीचे राहते वाडे, स्नान करण्याचे मोठाले दगडी हौद, खगोलशास्त्रज्ञांना आश्चर्यचकित करणारे ध्रुवतारा दाखवणारे यंत्र अशी एक ना अनेक स्थळे या दुर्गात बघायला मिळतात. इथली राजसदर पाहिल्यावर रायगडावरील राजदरबार आठवल्यावाचून राहवत नाही.

पुसावनुरच्या नवाबाकडून 1746 मध्ये हा प्रदेश मराठ्यांच्या अधिपत्याखाली आला. मराठ्यांचे मांडलिक असूनही कित्तूरने आपली स्वतंत्र ओळख आणि राजकीय स्वायत्तता टिकवून ठेवली होती. त्यानंतर 1782 मध्ये राजा मल्लसर्जा यांनी कित्तूरचे सिंहासन सांभाळले. बेळगावजवळील काकतीच्या एका लिंगायत कुटुंबातील चेनम्मासोबत त्यांचा विवाह झाला. लहानपणापासून तलवारबाजी, घोडेस्वारी, धनुर्विद्या याचे शिक्षण तिने घेतले होते. 1816 मध्ये राजा मल्लसर्जा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. इथून फासे उलटे पडायला सुरुवात झाली. 1818 मध्ये मराठेशाही खालसा झाल्यावर इंग्रज आणखी प्रबळ झाले. 1824 मध्ये राणी चेनम्मा यांच्या एकुलता एक मुलगा स्वर्गवासी झाल्यावर राजगादीला वारस म्हणून त्यांनी शिवलिंगप्पा नावाच्या मुलाला दत्तक घेतले, पण इंग्रजांनी त्याचा हक्क अमान्य करत “अण्ऊRघ्ऱं ध्इ थ्Aझ्ए‘िं‘ च्या अंतर्गत कित्तूर घशात घालण्यासाठी पावले उचलायला सुरुवात केली.

याचा परिणाम म्हणजे 1824 साली राणी चेन्नम्मा यांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. पहिल्या युद्धात अतुलनीय शौर्य गाजवून कित्तूरच्या सैन्याने धारवाडच्या कलेक्टरला सर जॉन ठाकरे याला ओलीस ठेवला.

पहिल्या युद्धात पराभूत झाल्यानंतर ब्रिटिशांनी अधिक सैन्यासह पुन्हा आक्रमण केले. फितुरीमुळे कित्तूरचा पाडाव झाला आणि राणी चेन्नम्मा यांना बेलहोंगलच्या किल्ल्यात कैद करण्यात आले. 21 फेब्रुवारी 1829 रोजी बेलहोंगलच्या कारागृहात त्यांचे निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांचा सेनापती संगोळी रायणणा यांनी ब्रिटिशांविरुद्धचा लकाही काळ सुरू ठेवला. राणी चेन्नम्मा यांचे शौर्य आज संपूर्ण भारतासाठी अभिमानास्पद असून दरवर्षी ‘कित्तूर उत्सव’ साजरा करून त्यांच्या त्यागाचे स्मरण केले जाते.

कित्तूर किल्ल्याच्या आत सध्या पुरातत्व विभागाने सुरू केलेले एक वास्तूसंग्रहालयदेखील आहे. बेळगावला गेल्यावर वाट वाकडी करून कित्तूरचे संग्रहालय आणि किल्ला आवर्जून पहा!

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.