Suryakumar Yadav reaction after Mumbai Indians defeat vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये शनिवारी शेवटच्या चेंडूवर थरारक विजय मिळवून मुंबई इंडियन्सला स्पर्धेबाहेर फेकले. MI च्या १६६ धावांचा पाठलाग करताना RCB कडून कृणाल पांड्याने ( Krunal Pandya) अविश्वसनीय खेळी केली. पण, १८व्या षटकात तिलक वर्माच्या अफालतून झेलने सामन्याला कलाटणी दिली.
झेलबाद होण्यापूर्वी कृणालने त्या षटकात दोन षटकार खेचून RCBसाठी संधी ठेवली होती. मात्र, जसप्रीत बुमराहने १९व्या षटकात फक्त ३ धावा दिल्या अन् सामना पुन्हा मुंबईच्या पारड्यात झुकला. राज बावाने हा सामना जिंकण्यासाठी चांगले प्रयत्न केले, पंरतु शेवटच्या चेंडूवर दोन धाव घेण्यात RCB यशस्वी ठरले आणि ते IPL 2026 Point Table मध्ये ते अव्वल स्थानी पोहोचले.
शेवटच्या षटकाचा थरार...RCB ला ६ चेंडूंत १५ धावा हव्या होत्या आणि रोमारिओ शेफर्ड मैदानावर असल्याने हे शक्य आहे असेच वाटले होते. पण, MI ने २०वे षटक राज बावाला दिले आणि त्याने पहिल्या दोन चेंडूवर वाईड-नो बॉल टाकला. फ्री हिटवर त्याने केवळ एक धाव दिली, परंतु पुढचा चेंडू वाईड टाकला आणि त्यावर शेफर्डने एक धाव पळून काढली. त्यामुळे ५ चेंडू १० धावा असा सामना जवळ आला.
RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viralतिसऱ्या चेंडूवर शेफर्डची ( ४) विकेट मिळवून बावाने सामन्यातील चुरस कायम राखली. चौथा चेंडू वाईट टाकला आणि त्यानंतरचा चेंडू भुवनेश्वर कुमारने षटकार लगावला. आता २ चेंडू ३ धावा असा सामना जवळ आला होता . भुवीने एक धाव घेतली आणि रसिख सलाम स्ट्राईकवर गेला. त्याने शेवटचा चेंडू चतुराईने सरळ खेळला अन् दोन धावा पळून काढल्या. रसिखने डाईव्ह मारली नसती तर तो रन आऊट झाला असता अन् सामना सुपर ओव्हरमध्ये गेला असता.
RCB चा हा मुंबईविरुद्ध शेवटच्या चेंडूवर मिळवलेला दुसरा विजय ठरला. यापूर्वी २०२१ मध्ये १६० धावांचा पाठलाग करताना मुंबईने २ विकेट्सने विजय मिळवला होता. मुंबईला सलग सहा पर्वात ट्रॉफीशिवाय रहावे लागेल. MI कडून तिलक वर्म ( ५७) व नमन धीर ( ४७) यांनी चांगला खेळ केला. भुवनेश्वर कुमारने चार विकेट्स घेतल्या. RCB कडून कृणाल पांड्याने ४६ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ७३ धावा केलय्ा. जेकब बेथेलने २७ धावांचे योगदान दिले. कॉर्बिन बॉशने चार विकेट्स घेतल्या.
सूर्यकुमार यादव म्हणाला," राज बावाकडे डेथ ओव्हर्समधील गोलंदाजीचा खूप चांगला सराव करत होता आणि या वर्षी तो एक पूर्णपणे वेगळाच अष्टपैलू खेळाडू म्हणून समोर आला आहे. त्यामुळे त्याला षटक देण्याचा निर्णय घेतला. त्याने आमच्यासाठी सामना जिंकवून देण्याचा जवळपास प्रयत्न केलाच होता. आम्ही १०-१५ धावांनी कमी पडलो. फलंदाजी करताना चुकीच्या वेळी पडलेल्या विकेट्स हे याचे कारण म्हणता येईल. नमन आणि तिलक यांनी अप्रतिम फलंदाजी केली आणि आपला कणखरपणा सिद्ध केला."
तो पुढे म्हणाला,"हा खेळाचाच एक भाग आहे. मला वाटते की आपण फक्त हा खेळ खेळण्याचा प्रयत्न करत राहिले पाहिजे, कारण आपले या खेळावर प्रेम आहे. गुणतालिकेत तळाशी राहण्याची आम्हाला सहसा सवय नसली, तरीही. ही परिस्थिती स्वीकारणे खूप कठीण आहे. आशा आहे की, पुढच्या वर्षी आम्ही जोरदार पुनरागमन करू."