'साऊथच्या कलाकारांना मान-सन्मान मिळत नाही...', तमिळ अभिनेत्रीचा बॉलिवूडवर खळबळजनक आरोप, नेमकं काय म्हणाली?
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क May 11, 2026 09:43 AM

Tamil Actress Simran Blamed On Bollywood: सिनेसृष्टी (Film Industry) म्हटलं की, ग्लॅमर आलंच, पण त्याच्याच दुसऱ्या बाजूला काळाकुट्ट अंधारही असतोच. अनेकांना इथे विचित्र अनुभव वाट्याला येतात. कित्येकदा अनेकांनी आपल्याला आलेल्या वाईट अनुभवांबाबत सांगितलं देखील आहे. असाच अनुभव एका तमिळ सिनेसृष्टीतील (Tamil Film Industry) नावाजलेल्या अभिनेत्रीच्या देखील वाट्याला आलाय. आम्ही जिच्याबाबत बोलतोय, तिचं नाव सिमरन (South Actress Simran). तिनं अलिकडेच अगदी जाहीरपणे बॉलिवूडबाबत (Bollywood News) आपलं स्पष्ट मत मांडलंय. 

तमिळ सिनेसृष्टीतील (Tamil Film Industry) अभिनेत्री सिमरन (Actress Simran) हिनं अगदी ठामपणे सांगितलंय की,  बॉलिवूडमध्ये साऊथ इंडस्ट्री (South Industry) आणि तिथल्या कलाकारांना जेवढा मान मिळायला हवा, तेवढा मान त्यांना दिला जात नाही. एका मुलाखतीत बोलताना तिनं म्हटलं की, साऊथच्या कलाकारांना बॉलिवूडमध्ये तो मान आणि ती ओळख मिळत नाही, जी त्यांना खऱ्या अर्थानं मिळायला हवी. ही बाब तिच्यासाठी नेहमीच खेदजनक राहिल्याचंही तिनं सांगितलंय.

'It is better than playing an aunty!': Simran reveals shocking response  from actor | Mathrubhumi English

"...म्हणून अनेक हिंदी चित्रपट नाकारले" (Actress Simran On Bollywood)

'फिल्मफेअर'शी बोलताना सिमरननं खुलासा केलाय की, "मी अनेकदा हिंदी सिनेमे नाकारले आहेत, कारण तिथल्या लोकांशी मला मनापासून जोडून घेता येत नाही. तिथे गेल्यावर असं वाटतं की, या लोकांनी आमचं काम पाहिलंच नाहीये किंवा त्यांना आमच्या योगदानाची (वारशाची) काहीच कल्पना नाहीये. मी माझ्या आयुष्यातील अर्धा काळ सिनेसृष्टीला समर्पित केला आहे, आणि त्या समर्पणाच्या बदल्यात जर काहीच मान मिळत नसेल, तर ती गोष्ट खरोखरंच खूप वेदनादायी असते..."

अभिनेत्री सिमरन हिनं पुढे बोलताना असंही नमूद केलंय की, "काही निर्मिती संस्था तर अगदी मूलभूत सुविधांच्या बाबतीतही घासाघीस करतात. राहण्याची सोय असो किंवा जेवणाची, अशा सुविधांसाठी सतत वाटाघाटी कराव्या लागणं, हा एक अत्यंत त्रासदायक अनुभव असतो..."

साउथ एक्टर्स की नहीं इज्जत होती', तमिल एक्ट्रेस ने बॉलीवुड पर लगाया बड़ा आरोप, कही ये बात

सनी देओल आणि ओम छंगानी यांचं केलं कौतुक

दरम्यान, तिनं हे देखील नमूद केलं की, बॉलिवूडमधील प्रत्येक व्यक्ती सारखीच नसते. या संभाषणादरम्यान, या अभिनेत्रीनं सनी देओल आणि सिनेनिर्माते ओम छंगानी यांचं कौतुक केलंय. 'गबरू' (Gabru) या सिनेमात काम करण्याचा आपला अनुभव सांगताना सिमरन म्हणाली की, "सनी देओल यांच्यासोबत काम करणं हा एक आनंददायी अनुभव होता. ते अत्यंत सज्जन आणि नम्र व्यक्ती आहेत..." चित्रपटाचे निर्माते ओम छंगानी यांचं कौतुक करताना तिनं पुढे सांगितलं की, "सेटवर त्यांनी माझी खूप चांगली काळजी घेतली..." याव्यतिरिक्त, या अभिनेत्रीनं असंही नमूद केलं की, 'गुलमोहर' (Gulmohar) या सिनेमाच्या टीमसोबत काम करण्याचा तिचा अनुभव अतिशय सुखद होता.

सिमरनची आजवरची सिनेसृष्टीतली कारकीर्द (Actress Simran Hindi Movies)

तमिळ अभिनेत्री सिमरनच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झाल्यास, तिनं आपल्या अभिनयाच्या प्रवासाची सुरुवात 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सनम हरजाई' (Sanam Harjai) या सिनेमाद्वारे केली. तिनं 'सुपरहिट मुकाबला' (Superhit Muqabla) या संगीत कार्यक्रमाचं सूत्रसंचालनही केलं होतं. तिच्या कामामुळे प्रभावित होऊन जया बच्चन यांनी तिला 'तेरे मेरे सपने' (Tere Mere Sapne) या सिनेमात भूमिका दिली. त्या सिनेमातील 'आँख मारे' हे गाणं प्रचंड लोकप्रिय ठरलं.

याशिवाय, 1996 मध्ये तिनं मल्याळम सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि मामूट्टी यांच्यासोबत 'इंद्रप्रस्थम' (Indraprastham) या सिनेमात काम केलं. हा सिनेमा व्यावसायिकदृष्ट्या अपयशी ठरला असला तरी, सिमरनच्या अभिनयाचं मात्र सर्वत्र कौतुक झालं. 1997 मध्ये प्रदर्शित झालेले 'वन्स मोअर' (Once More) आणि 'व्हीआयपी' (VIP) यांसारखे सिनेमे तमिळ सिनेसृष्टीत तिची स्वतःची ओळख निर्माण करण्यास सहाय्यक ठरले.

सिमरनच्या फिल्म्स (Actress Simran  Career Graf)

अभिनेत्री सिमरनच्या गाजलेल्या सिनेमांचा विचार करता, या यादीत 'कन्नाथिल मुत्तमित्तल', 'प्रियमाना तोझी', 'पम्मल के. संबंधम' आणि 'पंचतंत्रम' यांसारख्या सिनेमांचा समावेश होतो. अलीकडेच ती एम. शशिकुमार यांच्यासोबत 'टुरिस्ट फॅमिली' या सिनेमात दिसली. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं, इतकं की, खुद्द समीक्षकांनीही तिच्यावर स्तुतिसुमनं उधळली. या सिनेमानं 2025 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत आपलं स्थान निश्चित केलंय.

 

Actress Vimi Struggle Life Story: लिव्ह-इन पार्टनरनं 'देहविक्रीच्या' दलदलीत ढकललं, ज्याच्यासोबत लग्न केलं त्यानं नशेच्या गर्तेत बुडवलं, वयाच्या 34व्या वर्षी स्टार अभिनेत्रीचं दुर्दैवी अंत, ओळखलं का कोण?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.