*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*
☀️ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार
☀️ सूर्योदय – ०६:०५
☀️ सूर्यास्त – १८:५५
चंद्रोदय – २६:२७
⭐ प्रात: संध्या – ०४:५३ ते ०६:०५
⭐ सायं संध्या – १८:५५ ते २०:०७
⭐ अपराण्हकाळ – १३:४७ ते १६:२१
⭐ प्रदोषकाळ – १८:५५ ते २१:०९
⭐ निशीथ काळ – ००:०७ ते ००:५२
⭐ राहु काळ – ०७:४१ ते ०९:१७
⭐ यमघंट काळ – १०:५३ ते १२:३०
♦️ लाभदायक----
लाभ मुहूर्त– १५:४२ ते १७:१८
अमृत मुहूर्त– ०६:०५ ते ०७:४१
विजय मुहूर्त— १४:३८ ते १५:२९
⏳ कार्यसिद्धी वेळा – ०६:०५ ते ०७:४१ | १२:३० ते १३:४७ | १६:२१ ते १८:०३ | १९:३९ ते २१:५३
⚠️ कार्यनाशक वेळा – ०७:४७ ते ११:१३ | १३:४७ ते १६:२१ | १८:०३ ते १९:३९ | २१:५३ ते २४:००
मुंबई बंदर भरती/ओहोटी – भरती: ०१:५५ ते ०७:४९ | ओहोटी: ०७:४९ ते १३:४६ | भरती: १३:४६ ते २०:११ | ओहोटी: २०:११ ते ०२:३१ पुढील दिवस
ग्रहमुखात आहुती – राहु (अशुभ)
अग्निवास – पृथ्वीवर (दिवसभर)
️ शिववास – १०:२१ पर्यंत सभेत असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे त्यानंतर क्रीडेत असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे
शालिवाहन शक १९४८
संवत्सर पराभव
अयन – उत्तरायण
ऋतु – वसंत
मास – वैशाख
पक्ष - कृष्ण पक्ष
तिथी – नवमी (१०:२१ नं.) दशमी
वार – सोमवार
नक्षत्र – शतभिषा (२०:३९ नं.) पूर्वाभाद्रपदा
योग – ऐंद्र (२०:३२ नं.) वैधृति
करण – गरज (१०:२१ नं.) वणीज
चंद्र रास – कुंभ
सूर्य रास – मेष
गुरु रास – मिथुन
दिनविशेष – भद्रा २२.०३ नं., सूर्याचा कृत्तिका नक्षत्र प्रवेश १८.५१
✅विशेष "अधिक ज्येष्ठ महिना मासिक राशिभविष्य--"
भविष्यात येणाऱ्या शुभ संकेतांचा आणि संकटांचा अंदाज आल्यास आपल्या कामांचे आणि प्रयत्नांचे नियोजन करणे सुकर होते. या दृष्टीने मासिक राशिभविष्य या मालिकेतील नवा व्हिडिओ घेऊन आलो आहोत.
१७ मे २०२६ ते १५ जून २०२६ या काळामध्ये जो महिना येत आहे, तो 'अधिक' ज्येष्ठ महिना कोणत्या राशीला कोणती फळे देणार आहे, कोणत्या राशीच्या व्यक्तींनी विशिष्ट उपासना केल्याने या फळांची तीव्रता कमी होऊ शकेल याविषयी सांगत आहेत पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासरक श्री. गौरव देशपांडे खालील युट्यूब लिंकवर-
https://youtu.be/OsFCmJdIyEU?si=nhGax84cUejI6xXv
शुभाशुभ दिवस - २०:३२ प. शुभ दिवस
श्राद्ध तिथी - दशमी श्राद्ध
आजचे वस्त्र – पांढरे
स्नान विशेष – वाळा, शिरस, केशर, रक्तचंदन यापैकी कोणतेही पाण्यात टाकून स्नान करावे.
उपासना – ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा.
दान – सत्पात्री व्यक्तीस तांदूळ, कापूर, मोती, श्वेतवस्त्र, घृताने भरलेला कुंभ दान करावे
तिथीनुसार वर्ज्य – दुधी भोपळा, क्षौर
दिशाशूल उपाय – दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा करण्यापूर्वी दूध पिऊन बाहेर पडावे.
चंद्रबळ – मेष , वृषभ , सिंह , कन्या , धनु , कुंभ — या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे