- खरातचा ताबा मिळवण्यासाठी ED कडून न्यायालयात अर्ज
- न्यायालयाने ED अर्ज मंजूर केल्याची माहिती
- अध्यात्म आणि आशीर्वादाचा बनाव रचून अशोक खरातने उभे केलेले साम्राज्य नेमके कशाच्या जोरावर? ED कडून केला जाणार तपास
बीड : माजलगाव अत्याचार प्रकरणी मुलीचा गर्भपात; वडिलांना न्यायालयीन कोठडीबीडच्या माजलगावमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय... अल्पवयीन चुलत भावाच्या अत्याचारानंतर गर्भवती राहिलेल्या भोळसर मुलीचा बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केलीय... मुलीला गर्भपातासाठी रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या तिच्या वडिलांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावलीय. तर गर्भपात करणाऱ्या फुलेनगर येथील महिला डॉक्टर विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय. अटकेपूर्वी डॉक्टर महिलेची अचानक रक्तदाब वाढल्याने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर कोणत्याही या महिला डॉक्टरला अटक केली जाऊ शकते... या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रायगड दौऱ्यावरराज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रायगड दौऱ्यावर येत आहेत. त्या रायगडच्या रोहा शहरात येत असून त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांचा रोहा हा बालेकिल्ला आहे. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा असल्याने राजकिय आणि भावनिक दृष्ट्या या दौऱ्याला वेगळ महत्व आहे. सुनेत्रा पावर यांच्या हस्ते रोहा शहरात 16 कोटी 32 लाख रूपयांच्या विकास कामांच भुमीपुजन या दौऱ्यादरम्यान केल जाणार आहे.
देव्हाडी उड्डाणपुलावर भीषण अपघात... ट्रेलरच्या धडकेत तरुण जागीच ठाररामटेक-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील देव्हाडी उड्डाणपुलाच्या पोचमार्गावर एक हृदयद्रावक घटना घडली.भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रेलरने रस्ता ओलांडणाऱ्या मायलेकांना जोरदार धडक दिली.या भीषण अपघातात ३० वर्षीय तरुण जागीच ठार झाला, तर त्याची आई गंभीर जखमी झाली आहे
नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणारनसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण
पुढील ३ ते ४ दिवसाच्या आत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार
घटनेपासून १५ दिवसांच्या आत चार्जशीट दाखल केले जाणार असल्याची पोलिसांकडून देण्यात आली आहे ग्वाही
पुणे ग्रामीण पोलिसांकडून दोषारोपपत्र सादर केल्यानंतर सरकारी वकिलांची नियुक्ती केली जाणार
लवकरात लवकर न्यायालयात चार्जशीट सादर व्हावं यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून देखील प्रयत्न सुरू