प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीविरोधात कट, विजेचा शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न फसला; पत्नीसह प्रियकराला अटक, यवतमाळच्या वडगावमध्ये खळबळ
निलेश फाळके May 11, 2026 01:13 PM

Yavatmal Crime News : यवतमाळच्या वडगाव जंगल परिसरातून एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात अनैतिक संबंधांतुन (Extramarital Affair) पत्नीने प्रियकराच्या मदतीने चक्क पतीचा मारण्याचा प्रकार समोर आला आहे. यवतमाळच्या (Yavatmal Crime) वडगाव जंगल पोलीस ठाण्यांतर्गत पंगडी येथे हा प्रकार उघडकीस आला. पती झोपेत असताना त्याला विजेचा शॉक देऊन मारण्याचा कट पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने रचला. मात्र पती या जीवघेण्या हल्ल्यातून (Yavatmal Crime News) सुदैवाने बचावला आहे. या धक्कादायक घटनेनं एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. (Maharashtra Crime News)

Yavatmal Crime News : विजेचा शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न फसला; पत्नीसह प्रियकराला अटक

मिळालेल्या माहितीनुसार, गजानन मोरे असे बचावलेल्या पतीचे नाव आहे. तर आरोपी पत्नी कवडी गजानन मोरे आणि प्रियकर गावातीलच विष्णु कडू आत्राम असे आरोपीचे नाव असून या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. पती गजानन मोरे यांच्या तक्रारीनुसार त्याची पत्नी कवडी गजानन मोरे हिचे गावातील विष्णु कडू आत्राम याच्यासोबत प्रेमसंबंध होते. या संबंधांमध्ये पती अडसर ठरत असल्याच्या कारणावरून आरोपींनी कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास वडगाव जंगल पोलीसा ठाणे करीत आहे. मात्र या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Bhandara Aaccident : भरधाव ट्रेलरनं मायलेेकाला चिरडलं; मुलाचा घटनास्थळीचं मृत्यू तर, आई गंभीर

एसटी बसमधून उतरून महामार्ग ओलांडत असताना भरधाव आलेल्या ट्रेलरनं मायलेेकाला चिरडलं (Bhandara Aaccident). या भीषण अपघातात मुलाचा घटनास्थळीचं मृत्यू (Aaccident) झाला. तर, आई गंभीर जखमी झाली. ही घटना भंडाऱ्याच्या तुमसर - तिरोडा महामार्गावरील (Tumsar-Tiroda Highway) देव्हाडी इथ घडली. बाल्या बिरणवारे (३०) असं मृत मुलाचं नावं आहे. गंभीर जखमी आईवर तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी ट्रेलर चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. दरम्यान, बराच वेळ या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक खोडांबली होती. तुमसर पोलिसांनी ती पूर्वत केली. (Bhandara Aaccident News)

इतर महत्वाच्या बातम्या :  

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.