नागपूर: शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या अतिविशेषोपचार इमारतीचे काम पूर्णत्वास आले आहे. १३ जुलै २०२५ मध्ये दंतचे अतिविशेषोपचार रुग्णालय रुग्णांच्या सेवेत दाखल होणार होते.
परंतु, अद्याप आवश्यक यंत्रसामग्री मिळाली नाही. नागपुरात एकाच छताखाली जागतिक दर्जाच्या दंत उपचारांची सुविधा मिळण्याची आशा निर्माण झाली असली, तरी प्रत्यक्षात सेवा कधी सुरू होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दंतच्या अतिविशेषोपचार रुग्णालयाला २०१८ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. पहिल्या टप्प्यात पाच मजली इमारतीसाठी २२ कोटी ४७ लाखांचा निधी मंजूर झाला. २०१९ मध्ये बांधकाम सुरू झाले. तब्बल २ हजार ०५२ चौरस मीटर क्षेत्रात तळ मजल्यासह सहा माळ्यांची आधुनिक इमारत उभी राहिली.
Nagpur News: एसआयआरपूर्वी मतदार तपासणीचा वेग मंदावला;१७ लाख मतदारांची तपासणी अद्याप बाकीत्यासाठी पाच वर्षे लागले. तब्बल सहा वर्षांनंतरही रुग्णांना दंतोपचारांपासून वंचित राहावे लागत आहे. दरवर्षी दंतोपचारासाठी पाऊणेदोन लाखांवर रुग्णांची नोंदणी होते. यातील सुमारे २५ टक्के रुग्णांना दंतच्या सुपर स्पेशालिटी उपचाराची गरज आहे.
त्यांना बाहेरचा रस्ता दाखवावा लागतो. पहिल्या टप्प्यात डिजिटल डेंटिस्ट्री, कॉस्मेटिक डेंटिस्ट्री, ओरल इम्प्लांटोलॉजी, स्पोर्ट्स डेंटिस्ट्री आणि फॉरेन्सिक ओडोन्टोलॉजी हे पाच विभाग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती असून या विभागांसाठी ५ कायम आणि ८६ कंत्राटी पदांना मंजुरी मिळाली आहे.
Premium : Indian Premier League, क्रिकेटची 'इको सिस्टिम' बिघडवणारी 'एंटरटेनमेंट फॅक्टरी'? Expert Opinion वर्धापनदिनी तरी दरवाजे उघडणार का?शासकीय दंत महाविद्यालयाचा १३ जुलै रोजी वर्धापन दिन आहे. या दिवशी तरी रुग्णालय रुग्णसेवेसाठी खुले होईल का, असा रुग्णांचा सवाल आहे. जिल्हा नियोजन समितीकडून (डीपीसी) ७ कोटींचा निधी मंजूर झाला. यामधून ४० डेंटल चेअर्स, एक्स-रे यंत्रणा, सीएडी-कॅम तंत्रज्ञान, अल्ट्रासॉनिक स्केलर यासारखी अत्याधुनिक उपकरणे खरेदी केली जाणार आहेत. मात्र, हा निधीही अपुरा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून यंत्र येण्यास सुरुवात झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्ष सेवा कधीपासून, याबाबत प्रशासनाने मौन बाळगले आहे.