Nagpur News: कोरड्या नदीपात्रामुळे पाणीबोंब;चार दिवस नळयोजना बंद; नागरिकांची पाण्यासाठी भटकंती
esakal May 11, 2026 02:45 PM

मोहाडी: पूर्णपणे आटलेल्या सूरनदीच्या पात्रामुळे मोहाडी नगरपंचायत क्षेत्रात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. नगरपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरात पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार माजला असून, गेल्या चार दिवसांपासून नळयोजना बंद असल्याने नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत.

फेब्रुवारी २०१५ मध्ये ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर कोट्यवधी रुपयांचा निधी मिळूनही मूलभूत पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. खोडगाव-मोहगाव (देवी) परिसरातील सूरनदीच्या पात्रावर आधारित नळयोजना कोरड्या पडलेल्या नदीमुळे अपयशी ठरत आहे.

Akola News: सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार;सिव्हिल लाइन्स परिसरातील घटना; पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

कोरड्या नदीपात्रात सुमारे सहा लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, त्यातून कोणताही उपयोग न झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

आंदोलनाचा इशारा

पाणीपुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांना विहिरी, बोअरवेल, खासगी टँकर आणि आरओ प्लांटवर अवलंबून राहावे लागते. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने आमदारांच्या पुढाकारातून एक टँकर उपलब्ध करून देण्यात आला असला तरी सुमारे १२ हजार लोकसंख्येसाठी तो अपुरा ठरत आहे. नगर विकास संघर्ष समितीने नगरपंचायतीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करीत आंदोलनाचा इशारा दिला. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

IPL 2026: मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीमधून बाहेर, पण आता बिघडवणार तीन संघांचं गणित? ३० कोटींची योजना तरीही पाणीटंचाई

३० कोटी २७ लाख रुपयांची नळयोजना २०२३ मध्ये मंजूर होऊनही तीन वर्षांनंतरही मोहाडीवासीयांना नियमित पाणी मिळत नसल्याचे वास्तव आहे. नियोजनाचा अभाव आणि कामातील दिरंगाईमुळे विकासकामे केवळ कागदावरच राहिल्याची टीका होत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.