Nagpur News: एसआयआरपूर्वी मतदार तपासणीचा वेग मंदावला;१७ लाख मतदारांची तपासणी अद्याप बाकी
esakal May 11, 2026 01:45 PM

नागपूर: मतदार यादीच्या दुरुस्तीसाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) प्रक्रियेपूर्वी जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार मॅपिंगच्या कामाला संथगतीचा फटका बसला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत २८ लाखांहून अधिक मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असले, तरी अद्याप १७ लाखांपेक्षा अधिक मतदारांची पडताळणी बाकी असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

पाच राज्यांतील निवडणुका आटोपल्याने लवकरच ही प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू होणार असल्याची चर्चा आहे. त्यापूर्वी मतदार यादीच्या तपासणीचे काम शंभर टक्के पूर्ण करायचे आहे. २००२ ची मतदार यादी गृहीत धरून मतदारांची तपासणी करायची आहे. २००२ मध्ये नागपूर जिल्ह्यात २५ लाख २२ हजार १९८ मतदार होते.

Nagpur News: आधार कार्ड, फोटो घेतला; नळ कनेक्शनचा पत्ता नाही ; मॉडेल मिल चाळीतील नागरिकांचा संताप ; वर्षानुवर्षे रहिवासी टँकरवर अवलंबून

तर २०२५ मध्ये ही मतदार संख्या ४६ लाख ४२ हजार ८०० वर पोहोचली आहे. आतापर्यंत २८ लाख ४५ हजार ११० वर मतदारांची म्हणजेच ६१.२८ टक्के तपासणी झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे आता आणखी सुमारे १७ लाख ९७ हजारांवर मतदारांची तपासणी शिल्लक राहिली आहे.

जिल्ह्यात ४ हजार ६१० बुथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) आहेत. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, दररोज साधारणत: १ टक्क्यावर तपासणीचे काम होत होते. परंतु, काही दिवसांपासून तपासणीचा वेग मंदावून तो अर्धा टक्क्यांपेक्षा कमीवर आला आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी, पुलाखाली ट्रक अडकल्यानं वाहनांच्या रांगा

बीएलओकडून टाळाटाळ होत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून शंभरावर बीएलओंना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. तर १६ बीएलओंवर जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाईदेखील प्रस्तावित केली आहे.

एसआयआरच्या कामात जिल्ह्या पूर्वी राज्यातील ३६ जिल्ह्यांमधून शेवटून चौथ्या क्रमांकावर होता. गेल्या काही दिवसांमध्ये या रॅंकिंगमध्ये किंचीत सुधारणा होऊन नागपूर जिल्ह्याने राज्यात ३० व्या क्रमांकापर्यंत मजल मारल्याचे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.