पिंपळेश्वर देवस्थानात १४, १५ मे रोजी भव्य वार्षिक महोत्सव
esakal May 11, 2026 10:45 PM

पिंपळेश्वर देवस्थानात १४, १५ मे रोजी भव्य वार्षिक महोत्सव
जोगेश्वरी, ता. ११ (बातमीदार) ः पिंपळेश्वर कासार्डे तर्फेवाडी विकास मंडळ, मुंबई आणि नवचैतन्य क्रीडा मंडळ (ग्रामस्थ) यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळेश्वर देवस्थान, कासार्डे (तर्फेवाडी) येथे भव्य वार्षिक महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार (ता. १४), शुक्रवार (ता. १५) हा उत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या डबलवारी भजनांच्या जंगी सामन्याला शुक्रवारी रात्री ९ वाजता सुरुवात होणार आहे. यामध्ये भजन सम्राट बुवा संदीप पुजारे आणि बुवा गुंडू सावंत यांच्यात रंगतदार जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.