झोटिंगदेव मैदानाचा होणार कायापालट
esakal May 11, 2026 10:45 PM

झोटिंगदेव मैदानाचा होणार कायापालट
नेरूळ, ता. ११(बातमीदार) ः नेरूळ सेक्टर २६ मधील भूखंड क्रमांक दोन आणि सहावरील झोटिंगदेव मैदानाचे सुशोभीकरण आणि विकासकामे लवकरच हाती घेण्यात येणार आहेत. या कामाला स्थायी समितीकडून मंजुरी मिळाल्याने प्रत्यक्ष कामाला वेग येणार आहे.
परिसरातील विविध सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आणि उत्सवांसाठी हे मैदान मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. त्यामुळे नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने मैदानाच्या विकासाचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत मैदानावर नवीन स्टेज उभारण्यात येणार असून मैदानाचे समतलीकरणही केले जाणार आहे. तसेच शौचालय, चेंजिंग रूम आणि इतर आवश्यक नागरी सुविधांचाही प्रकल्पात समावेश केला आहे. या कामांमुळे परिसरातील नागरिकांसाठी मैदान अधिक सुसज्ज आणि सुविधायुक्त होणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.