सोन्याच्या खरेदीत भारात आघाडीवर, दरवर्षी देशात किती केली जाते सोन्याची खरेदी? जाणून घ्या सविस्तर माहिती
एबीपी माझा वेब टीम May 11, 2026 11:13 PM

Gold News :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला वर्षभर सोने न खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. मध्य पूर्वेतील तणावामुळे परकीय चलन साठा सुरक्षित राहील, असा सरकारचा विश्वास आहे. पण तुम्हाला माहित आहे का की भारत हा जगातील सर्वाधिक सोने खरेदी करणाऱ्या देशांपैकी एक आहे. भारतात दरवर्षी किती सोन्याची खरेदी केली जाते याबाबतची माहिती पाहुयात. 

भारतात किती सोन्याची आयात होते?

दरम्यान, भारत मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करणारा देश आहे. दरवर्षीदेशात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी होते.भारतात दरवर्षी 700 ते 800 टन सोन्याचा वापर होतो. देशात देशांतर्गत उत्पादन कमी असल्यामुळे 90 टक्के सोने आयात केले जाते. 2026 मध्ये हा वापर किंचित कमी झाला आहे. जानेवारीमध्ये मागणी अंदाजे 100 टन होती, जी फेब्रुवारीपर्यंत 65 ते 66 टनांपर्यंत घसरली. मार्चमध्ये ती 20 ते 22 टनांपर्यंत कमी झाली. एप्रिलमध्ये सोन्याची आयात केवळ 15 टन होती. अनेक वर्षांत प्रथमच मासिक सोन्याची आयात इतकी कमी झाली आहे. दरम्यान, एका बाजुला सोन्याचे दर वाढत असताना दुसऱ्या बाजुला सोन्याची खऱेदी देखील वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

भारत किती लाख कोटी रुपयांचे सोने खरेदी करतो?

भारत दरवर्षी 7 लाख कोटी रुपयांचे सोने खरेदी करतो. भारताला ही किंमत डॉलर्समध्ये मोजावी लागते. जेवढे जास्त सोने खरेदी केले जाते, तेवढी डॉलरची मागणी वाढते. मागणी वाढल्याने डॉलरचा भाव वाढतो. याचा अर्थ रुपया कमकुवत होतो आणि रुपयाचे जेवढे अवमूल्यन होते, तेवढे तेल आणि सोने खरेदी करणे महाग होते. आज डॉलरचा भाव 95 रुपयांच्या वर बंद झाला.

मागणी जास्त कधी असते?

साधारणपणे, लग्नसराईच्या काळात बाजारात सोन्याची मागणी सर्वाधिक असते. या काळात लोक मोठ्या प्रमाणात दागिने खरेदी करतात आणि सोन्याची मागणी करतात. याव्यतिरिक्त, सणासुदीच्या काळात सोन्याची खरेदी वाढते. लोक गुंतवणुकीसाठीही सोने खरेदी करतात. परिणामी, भारतात सोन्याची मागणी अनेकदा जास्त असते. परंतु या वेळी, पुरवठ्यातील व्यत्यय, बँक मंजुरीतील विलंब, सीमाशुल्क मंजुरी आणि करांसंबंधीच्या अनिश्चिततेमुळे मागणी कमी असल्याचे उद्योग तज्ञांचे मत आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (WGC) नुसार, 2024 मध्ये भारतातील सोन्याची एकूण मागणी अंदाजे 802.8 टन होती. 2025 मध्ये, विक्रमी उच्च किमतींमुळे, हा आकडा अंदाजे 710.9 टनांपर्यंत कमी झाला.

Gold Silver Price Today: ‘वर्षभर सोने खरेदी करू नका...’ PM मोदींच्या आवाहनानंतर आज सोन्याचे दर घसरले की वाढले? पाहा तुमच्या शहरातील ताजे दर

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.