PBKS vs DC Live: स्टार्क, एनगिडी अपयशी ठरले, तिथे २२ वर्षीय माधवने मैदान गाजवले! प्रियांश, श्रेयसच्या फिफ्टीनंतरही माफक धावा...
esakal May 12, 2026 01:45 AM

Punjab Kings vs Delhi Capitals Marathi Update: पंजाब किंग्सचा दरारा पाहता... त्यांच्याकडून आज अपेक्षित खेळ पाहायला मिळाला नाही. प्रियांश आर्यने आक्रमक सुरुवात करून दिली, परंतु दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी मधल्या षटकात चांगला मारा केला. माधव तिवारी आणि मुकेश कुमार यांचा मारा प्रभावी ठरला. मिचेल स्टार्क, लुंगी एनगिडी हे आंतरराष्ट्रीय गोलंदाज हतबल झालेले असताना माधवने PBKS च्या प्रियांशला माघारी पाठवून DC ला मोठे यश मिळवून दिले. पण, शेवटच्या षटकांत श्रेयस अय्यर व कूपर कॉनली यांनी हात मोकळे करून PBKS ला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यास मदत करून दिली.

प्रियांश आर्यने पंजाब किंग्सला धडाकेबाज सुरूवात करून दिली. मिचेल स्टार्कच्या पहिल्याच चेंडूवर षटकार अन् पहिल्याच षटकात २२ धावा त्याने कुटल्या. ९३ डावात स्टार्कला दुसऱ्यांदाच पहिल्या चेंडूवर षटकार खावा लागला आणि आयपीएलमधील हे त्याचे महागडे षटक ठरले. प्रियांश DC च्या सर्व गोलंदाजांचे षटकारानेच स्वागत करताना दिसला आणि त्याने २५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याचा पराक्रम दोनवेळा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. डावातील पहिल्या चेंडूवर त्याने तीनवेळा षटकार खेचले आहेत, या विक्रमात यशस्वी जैस्वाल ( ४) अव्वल आहे.

PBKS vs DC Live: प्रियांश आर्यचा पहिल्याच चेंडूवर कल्ला... स्टार्कला हाणला Six! नोंदवला भारी विक्रम, अक्षर पटेल स्तब्ध... Video Viral

सातव्या षटकात प्रियांश व प्रभसिमरन सिंग ( १८) यांची ७८ धावांची भागीदारी मुकेश कुमराने संपुष्टात आणली. दिल्लीच्या गोलंदाजांनी दडपण बनवण्यात यश मिळवले होते. आयपीएलमच्या पहिल्या सहा षटकांत प्रियांशने तीनवेळा ५०+ हून अधिक धावांची खेळी केली आहे. या विक्रमात वैभव सूर्यवंशी ( ४) अव्वल स्थानावर आहे. ९व्या षटकात माधव तिवारीने त्याची आयपीएलमधील पहिली विकेट घेतली आणि त्याने प्रियांशला माघारी पाठवले. पंजाबच्या सलामावीराने ३३ चेंडूंत २ चौकार व ६ षटकारांसह ५६ धावांची खेळी केली. ( - Madhav Tiwari claims Priyansh as his maiden IPL wicket)

Who is Madhav Tiwari?

२०२५ च्या आयपीएल मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने माधव तिवारीला ४० लाख रुपयांना खरेदी केले होते. विशेष म्हणजे, वरिष्ठ स्तरावर कोणताही व्यावसायिक अनुभव नसताना त्याची निवड झाली होती. त्याने मध्य प्रदेश लीगमध्ये भोपाळ लेपर्ड्स (Bhopal Leopards) कडून खेळताना अवघ्या ३१ चेंडूत ६५ धावांची धडाकेबाज खेळी केली होती, ज्यामुळे तो चर्चेत आला. माधव तिवारी हा मूळचा मध्य प्रदेशातील सागर (Sagar) जिल्ह्याचा रहिवासी आहे, परंतु त्याचे बालपण आणि शिक्षण इंदूर येथे झाले. त्याचे वडील सुरेंद्र तिवारी हे व्यवसायाने वकील आहेत.

माधव तिवारीने प्रभावी मारा करताना श्रेयसलाही दडपणाखाली ठेवले होते. पंजाबच्या कूपर कॉनलीने १६व्या षटकापासून हात मोकळे केले आणि लुंगी एनगिडीला ४,६ असे फटके हाणले. श्रेयसने ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करण्यासाठी दमदार षटकार खेचला. श्रेयस व कूपर यांची ५२ चेंडूंत ८३ धावांची भागीदारी माधवने तोडली. कूपर २७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३८ धावांवर झेलबाद झाला. माधवच्या शेवटच्या षटकात १९ धावा आल्या आणि त्याची स्पेल ४-०-४०-२ अशी संपली.

IPL 2026 Controversy: टीम डेव्हिडला अखेर शिक्षा मिळाली! BCCI ने "अश्लील हातवारा" करणाऱ्या RCB च्या फलंदाजाला घडवली अदद्ल...

स्टार्कने त्याच्या शेवटच्या षटकात मार्कस स्टॉयनिस ( १) व शशांक सिंग (०) यांना बाद केले आणि तो ( २-५७) आज महागडा गोलंदाज ठरला. श्रेयसने ३६ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५९ धावांची नाबाद खेळी केली. सूर्यांश शेडगेने ८ चेंडूंत २१ धावा करताना पंजाबला ५ बाद २१० धावांपर्यंत पोहोचवले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.