सलमान खाननं केलं लॉन्च, चाहते म्हणाले, 'अरे ही तर हुबेहुब ऐश्वर्या राय'; पण अचानक झाली गायब, सध्या 'ती' करते काय?
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क May 12, 2026 09:13 AM

Salman Khan Launched Sneha Ullal: बॉलिवूडमध्ये (Bollywood News) अनेकजण आपलं नशीब आजमवायला येतात, त्यापैकी काही टॉपचे सेलिब्रिटी (Top Celebrity) बनतात, पण काही गर्दीत हरवून जातात. काही चेहरे येतात आणि यशाच्या सर्वोच्च शिखर गाठतात, पण कालांतरानं ते हरवून जातात. आजवर अनेक असेही चेहरे आलेत, जे त्यांचा अभिनय आणि सिनेमांपेक्षा चित्रपटांमुळेच जास्त चर्चेत राहिलेत. अशीच एक अभिनेत्री म्हणजे, स्नेहा उल्लाल (Actress Sneha Ullal). तिचं नाव ऐकताच आठवलं ना आम्ही कुणाबाबत बोलतोय ते... होय बरोबर ओळखलंत, ऐश्वर्या रायची (Aishwarya Rai) डुब्लिकेट, जिला सलमान खान यानं लॉन्च केलेलं. सुरुवातीला तिची हीच ओळख तिला बॉलिवूडमध्ये नाव कमावण्यासाठी फायदेशीर ठरली. पण, कालांतरानं तिची हीच ओळख तिच्या करिअरमधील सर्वात मोठा अडथळा ठरली. स्नेहाची कहाणी केवळ एक अभिनेत्री बनण्यापुरती मर्यादित नव्हती, तर तिनं ओळख निर्माण करण्यासाठी केलेल्या संघर्षाचीही कहाणी आहे.

स्नेहा उल्लाल (Sneha Ullal) हिचा जन्म 18 डिसेंबर 1987 रोजी ओमानमध्ये झाला आणि तिचं बालपणही तिथेच गेलं. ओमानमध्येच तिनं तिचं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर ती आपल्या आईसोबत मुंबईला स्थलांतरित झाली. मुंबईत आल्यावर तिनं तिचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. स्नेहाच्या कुटुंबाचा सिनेसृष्टीशी काडीमात्रही संबंध नव्हता आणि खुद्द स्नेहानंही कधी अभिनेत्री बनण्याचं स्वप्न पाहिलं नव्हतं. ती अगदी सर्वसामान्य माणसासारखं आयुष्य जगत असतानाच तिची सलमान खानची बहीण अर्पिता खान हिच्याशी मैत्री झाली, आणि हीच मैत्री पुढे तिच्या आयुष्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली.

सलमान खानसोबत पदार्पण (Salman Khan Launched Sneha Ullal)

सलमान खानची बहीण अर्पिता खानच्या माध्यमातूनच स्नेहाची सलमान खानशी भेट झाली. त्यावेळी स्नेहाचं वय जेमतेम 17 वर्ष होतं. स्नेहाचा चेहरा पाहून सलमान खान भारावून गेला, कारण तिचा चेहरा हुबेहुब ऐश्वर्या रायशी मिळताजुळता होता. याच कारणामुळे, तिला 'लकी: नो टाइम फॉर लव्ह' (Lucky : No Time for Love) या सिनेमात भूमिका देण्यात आली. हा सिनेमा 2005 मध्ये प्रदर्शित झाला आणि त्याच्या रिलीजसोबतच स्नेहा रातोंरात प्रसिद्धी झोतात आली. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी करू शकला नसला तरीही, स्नेहाचं सौंदर्य, आणि तिची ऐश्वर्या रायशी केली जाणारी तुलना, या गोष्टींची चर्चा मात्र जोरदार झाली.

ऐश्वर्या रायशी होणारी तुलनाच बनली डोकेदुखी (Sneha Ullal Lookalike Aishwarya Rai Bachchan)

ज्या गोष्टीमुळे स्नेहा रातोंरात स्टार झाली, पुढे तिच गोष्ट तिच्यासाठी डोकेदुखी ठरली. याबाबत एका मुलाखतीत बोलताना स्नेहानं खुलासा केलेला की, ही तुलना एका अर्थआनं 'पीआर स्ट्रॅटर्जी' होती. लोक तिच्याकडे एक 'नवा चेहरा' म्हणून पाहण्याऐवजी, केवळ 'दुसरी ऐश्वर्या' म्हणूनच पाहत होते. स्नेहानं वारंवार हे स्पष्ट केलेलं की, ती ऐश्वर्या रायची खूप मोठी चाहती आहे. तिला दुसऱ्या कोणाच्या तरी सावलीत वावरण्यापेक्षा, तिला आपल्या कामाच्या जोरावर स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण करायची होती.

HD sneha ullal wallpapers | Peakpx

साऊथमध्ये नशीब चमकलं, पण बॉलिवूडमध्ये नाही (Sneha Ullal In South Films)

सलमान खानसोबत 'लकी' (Lucky) सिनेमा केल्यानंतर, स्नेहानं 'आर्यन', 'क्लिक' आणि 'जाने भी दो यारों' यांसारख्या बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं. मात्र, आपल्या करिअरसाठी तिनं जे काही ठरवलेलं, ते मात्र तिला गाठता आलं नाही. त्यानंतर, स्नेहानं आपलं लक्ष साऊथ इंडस्ट्रीकडे वळवलं आणि तिथेच तिला खऱ्या अर्थानं आपलं स्थान गवसलं. तेलुगु फिल्म 'उल्लासंगा उत्साहंगा' (Ullasanga Utsahanga) तिच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी हिट ठरली आणि त्याबद्दल तिला 'सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री'चा पुरस्कारही मिळाला. पुढे, 'सिम्हा' (Simha) सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमानं तिला साऊथ इंडस्ट्रीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून दिली.

स्नेहा उल्लालला एका गंभीर आजाराचं निदान 

स्नेहाची कारकीर्द हळूहळू पुन्हा रुळावर येत असतानाच, नियतीनं मात्र तिच्यासोबत मोठा खेळ खेळला. तिला एका गंभीर 'ऑटोइम्यून विकार'शी (Autoimmune Disorder) लढा द्यावा लागला. तिची प्रकृती इतकी खालावली होती की, तिला सलग 30 ते 40 मिनिटांपेक्षा जास्त वेळ उभं राहणंही अशक्य झालं होतं. परिस्थितीनं भाग पाडल्यामुळे, तिला सिनेमांपासून दीर्घकाळासाठी विश्रांती घ्यावी लागली. या काळात, आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी ती प्रसिद्धीझोतापासून पूर्णपणे दूर गेली. जवळपास सहा वर्षांनंतर, 2022 मध्ये 'लव्ह यू लोकतंत्र' (Love You Loktantra) या सिनेमाद्वारे स्नेहानं पुन्हा एकदा सिनेसृष्टीत दमदार कमबॅक केलं. स्वतः स्नेहा हे मान्य करते की, कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात 'ऐश्वर्या रायसारखी दिसणं' ही गोष्ट तिच्यासाठी एक वरदान ठरली होती. पण कालांतरानं, तोच शिक्का तिच्यासाठी एक ओझ बनला. तरीही, अखेरीस तिनं आपल्या कर्तृत्वाची चुणूक सिद्ध करून दाखवली.

आता काल करते स्नेहा उल्लाल?

स्नेहा उल्लाल गंभीर आजारावर मात करुन फिल्म इंडस्ट्रीत परतली आहे. पण, कमर्शियल फेमपेक्षा ती ओटीटी प्लॅटफॉर्म आणि रिजनल सिनेमावर लक्ष केंद्रीत करतेय.  2026 मध्ये तिनं निलकांता फिल्ममधून तेलुगु सिनेमातून कमबॅक केलंय. तर 2025 मध्ये ती 'लव यू लोकतंत्र'मध्ये दिसून आलेली. याव्यतिरिक्त ती साको 363 मध्येही दिसून आलेली.

Actress Vimi Struggle Life Story: लिव्ह-इन पार्टनरनं 'देहविक्रीच्या' दलदलीत ढकललं, ज्याच्यासोबत लग्न केलं त्यानं नशेच्या गर्तेत बुडवलं, वयाच्या 34व्या वर्षी स्टार अभिनेत्रीचं दुर्दैवी अंत, ओळखलं का कोण?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.