सावधान! दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळाच, प्रशासनाचा मोठा अलर्ट, थेट..
Tv9 Marathi May 12, 2026 11:45 AM

राज्यात एकीकडे उन्हाळा तर दुसरीकडे पावसाळा अशी स्थिती आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात भारतीय हवामान विभागाने आज मोठा अलर्ट जारी केला. उष्णतेचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने जारी केला. सूर्य आग ओकताना दिसत आहे. त्यामध्येच प्रशासनाने नागरिकांना दुपारी 12 ते 4 अतिमहत्वाच्या कामाशिवाय घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोमवारी जळगाव येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. जळगावात 44.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढे होते. काल अनेक भागात पावसाने हजेरी लावली. कधी कडाक्याचे उन्ह तर कधी पाऊस अशी स्थिती आहे. आज भारतीय हवामान विभागाने जळगाव, नंदूरबार, नाशिक, धुळे, जालना, छत्रपती संभाजीनगर येथे उष्णतेच्या लाटेचा येलो इशारा जारी केला. यादरम्यान नागरिकांनी आरोग्याच्यी काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

वाढत्या तापमानामुळे जळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूर धरणाच्या पाणी साठ्यात मोठी घट झाली आहे. उन्हाळ्याच्या अडीच महिन्यातच वाघूर धरणाच्या पाणी साठ्यात तब्बल 15 टक्क्यांनी घट झाली आहे. उन्हाळापूर्वी 86% एवढा पाणीसाठा होता आता वाघूर धरणात 71 टक्के एवढा पाणीसाठी साठा शिल्लक आहे. यंदा उन्हाळा तीव्र असल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत पाण्याच्या बाष्पीभवनामध्ये देखील 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे..

मुंबईत तापमानाचा पारा 35 अंशांवर पोहचला आहे. उपनगरातही उष्णतेची तीव्रता अधिक बघायला मिळतंय. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णता चांगलीच वाढली आहे. दुपारच्या वेळी लाहीलाही होत आहे.

राज्यात पुढील काही दिवस उष्णता कायम राहण्याचा अंदाज आहे. उष्णघाताच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे. उष्णघात कक्षांची स्थापना देखील करण्यात आलीये. जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला प्रशासनाकडून दिला जात आहे. यंदा दरवर्षीच्या तुलनेत पावसाळा लवकर असल्याचे सांगितले जात आहे. पावसाळा संपून काही महिने झाली तरीही पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाहीये.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.