उन्हाळ्यात भारतातील ‘या’ ठिकाणी फिरायला जाण्याचा चुकूनही आखू नका बेत
GH News May 12, 2026 12:11 PM

भारतातील काही राज्यांमध्ये उन्हाचा तडाखा इतका वाढला आहे की गरजेशिवाय घरा बाहेर पडणेह कठीण होते. अशातच ऐन उन्हाळ्यात जेव्हा मुलांना सुट्ट्या पडतात तेव्हा प्रत्येकजण कुटूंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतातच. भारतात अनेक लोकप्रिय पर्यटन स्थळे आहेत, जी केवळ अत्यंत सुंदरच नाहीत, तर त्यांना सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वही आहे. मात्र, उन्हाळ्यात तुम्ही चुकूनही या ठिकाणं एक्सप्लोर करण्याचा विचार करत असाल तर ती तुमची सर्वात मोठी चूक होऊ शकते. कारण या ठिकाणी प्रचंड उष्णता जाणवू शकते. त्यामुळे सुट्टीच्या निमित्ताने फिरायला जाण्यासाठी कोणती ठिकाणे सर्वोत्तम आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. विशेषतः जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत ट्रिपचा प्लॅन करत असाल, तर प्रत्येक लहानसहान गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे, कारण तीव्र उष्णतेमुळे मुले आजारी पडू शकतात. चला तर मग उन्हाळ्यात कोणत्या ठिकाणी फिरायला जाणे टाळले पाहिजे ते जाणून घेऊयात.

उन्हाळ्याची सुट्टी पडली की प्रत्येकजण रोजच्या धकाधकीच्या जीवनातून आराम मिळवण्‍यासाठी कुठे तरी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. आतापर्यंत तुम्हाला उन्हाळ्याच्या हंगामात भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांबद्दल माहिती मिळाली असेल, पण ऐन उन्हाळ्यात कोणत्या ठिकाणी जाऊ नये हे देखील तुम्हाला माहित असले पाहिजे.

राजस्थान

राजस्थानला भेट देणे टाळा. जर आपण लोकप्रिय पर्यटन स्थळांबद्दल बोललो, तर राजस्थान हे एक असे ठिकाण आहे जिथे मुलांनी नक्कीच भेट दिली पाहिजे, कारण यामुळे त्यांना आपल्या गौरवशाली इतिहासाची जवळून ओळख होईल. यासोबतच त्यांना ठिकाणची संस्कृतीही समजेल. राजस्थानमधील जयपूर शहरही खूप सुंदर आहे आणि या दोन्ही ठिकाणी भेट देण्यासारखी काही अद्भुत ठिकाणे आहेत. पण उन्हाळ्यात राजस्थानला भेट देणे टाळा. कडक उन्हात किल्ल्यापासून बाजारापर्यंत चालणे खूप थकवणारे असू शकते. यामुळे डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते.

गुजरात

भारतातील या राज्यात लोकप्रिय आकर्षण असलेले ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’, तसेच साबरमती आश्रम, सोमनाथ, द्वारकाधिल मंदिर, कच्छचे रण, गिर राष्ट्रीय उद्यान आणि मोढेरा सूर्य मंदिर यांसारखी इतर अनेक सुंदर ठिकाणे आहेत. तथापि उन्हाळ्यात या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन टाळावे. ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान भेट देण्यासाठी उत्तम आहे.

मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, किंवा एमपी, हे आपल्या ऐतिहासिक स्थळांसाठी आणि अप्रतिम वास्तुकलेसाठी ओळखले जाते. खजुराहो हे सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे, त्यासोबतच सांची, मांडू आणि ओरछा यांसारखी ठिकाणेही लोकप्रिय आहेत. मात्र उन्हाळ्यात ही ‍ठिकाणं एक्सप्लोर करणे खूप त्रासदायक ठरू शकतात. भेट देण्यासाठी हिवाळा हा सर्वोत्तम काळ आहे, किंवा हवामान आल्हाददायक असेल असा महिना निवडा.

राजधानी दिल्ली

कुतुबमिनारपासून लाल किल्ल्यापर्यंत, देशाची राजधानी दिल्लीमध्ये पर्यटकांसाठी आकर्षणाची केंद्रे असलेली अनेक ठिकाणे आहेत, पण इथेही हवामान अत्यंत उष्ण होते आणि इथे उन्हात फिरल्याने केवळ थकवाच येत नाही, तर डिहायड्रेशन आणि उष्माघाताचीही भीती असते.

वाराणसी

उत्तर प्रदेशातच असलेल्या वाराणसीला ऐन उन्हाळ्यात भेट देणे टाळणेच उत्तम. हे शहर फिरण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा उत्तम पर्याय आहे आणि तिथल्या रस्त्यांवरून चालण्याचा अनुभव तर अतुलनीयच आहे. पण तीव्र उष्णतेमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणे आव्हानात्मक ठरू शकते. दिवसाच्या प्रखर सूर्यप्रकाशामुळे तुम्हाला गंगा नदीचा नीट अनुभव घेता येत नाही.

उन्हाळ्यात आग्राला जाणे टाळा

उत्तर प्रदेशात असलेले आग्रा शहर ताजमहालसाठी सर्वाधिक प्रसिद्ध आहे आणि मोठ्या संख्येने परदेशी पर्यटकांना आकर्षित करते. येथे इतरही अनेक ऐतिहासिक स्मारके आहेत, परंतु उन्हाळ्यात आग्रा या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन टाळावे. तीव्र उष्णता खूप त्रासदायक ठरू शकते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.