Mouni Roy Divorce Rumors: सध्या फिल्म इंडस्ट्रीत (Film Industry) एक नवा ट्रेंड धुमाकूळ घालतोय, तो म्हणजे, संसार मोडण्याचा. ऐकून थबकलात ना? गेल्या काही वर्षांत कित्येक सेलिब्रिटींची लग्न (Celebrity Marriage) मोडली आहेत. आता अशाच एका अभिनेत्रीच्या संसारात मिठाचा खडा पडल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अभिनेत्री मौनी रॉय (Actress Mouni Roy) ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री. आधी छोटा पडदा गाजवल्यानंतर मौनी रॉय (Mouni Roy) हिनं मोठ्या पडद्यावरही दमदार कमबॅक केलेलं. 'गोल्ड' (Gold), 'मेड इन चायना' (Made In China), 'ब्रह्मास्त्र: पार्ट वन : शिवा' (Brahmāstra: Part One – Shiva) आणि इतर अशा अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये (Bollywood Movie) ती झळकलेली. मौनी रॉय हिनं 2022 मध्ये सूरज नांबियार (Suraj Nambiar) हिच्यासोबत आपला संसार थाटला. मात्र, त्यांच्या वैवाहिक जीवनात सध्या सर्व काही सुरळीत सुरू नसल्याचं दिसून येतंय. मौनीच्या सोशल मीडियावरील एका विशिष्ट कृतीमुळे त्यांच्या विभक्त होण्याच्या आणि घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेषतः, मौनी आणि सूरज या दोघांनीही इन्स्टाग्रामवर एकमेकांना 'अनफॉलो' (Unfollow) केलं आहे. नेमकं हेच नेटकऱ्यांनी हेरलं आणि तिच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं.
काही काळापूर्वी, सोशल मीडिया युजर्सच्या हे लक्षात आलं की, मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना 'अनफॉलो' केलं आहे. त्यानंतर काहीच वेळात, जेव्हा 'बॉलिवूड बबल'नं यासंदर्भातील वृत्त त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन शेअर केली. त्यानंतर काही युजर्सनी असा अंदाज वर्तवला की, हे जोडपं कदाचित आता वेगळं होण्याचा विचार करतंय. एका युजरनं कमेंटसुद्धा केलीय की, "आता निरोप घेण्याची (बाय-बाय करण्याची) वेळ आली आहे..." तर, आणखी एका युजरनं लिहिलंय की, "हे घडणारच होतं, मौनी थोडी जास्तच 'स्मार्ट' वाटते." पुढे एका युजरनं लिहिलंय की, "त्यांनी एकमेकांसोबतचे फोटोही डिलीट केले आहेत."
ज्यावेळी मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांनी एकमेकांना अनफॉलो केलं, त्यावेळी काही युजर्सनी असंही म्हटलं की, त्यांनी एकमेकांसोबतचे आपले फोटोही डिलिट केले आहेत. पण, ज्यावेळी आम्ही मौनीचं इन्स्टा हँडल पाहिलं, त्यावेळी आम्हाला मात्र तिचे तिच्या पतीसोबतचे फोटो दिसले. पण, ते सर्व फोटो आधी शेअर केलेले होते. आता दोघांचा लेटेस्ट एकही फोटो नाही. त्यांच्या सर्वात अलीकडच्या फोटोंपैकी एक ऑगस्ट 2024 मधील आहे. त्यावेळी त्यांनी 'विशू', म्हणजेच मल्याळी लोकांचा नववर्ष सण, साजरा केला होता. त्यांचे लग्नाचे फोटोही त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर अजूनही आहेत. आतापर्यंत, इन्स्टाग्रामवर एकमेकांना 'अनफॉलो' करण्याच्या या प्रकारावर मौनी किंवा सूरज, या दोघांपैकी कोणीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.