नागपूर : कान्हा व्याघ्र प्रकल्पातील वाघ आणि शिमल्याच्या रेस्क्यू होममधील बिबट्याच्या शावकांमध्ये ‘कॅनाइन डिस्टेंपर व्हायरस’ (सीडीव्ही) आढळून आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील महाराजबाग प्राणीसंग्रहालय, गोरेवाडा बचाव केंद्र आणि बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात प्रशासनाने संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण केले आहे.
‘सीडीव्ही’ हा संसर्गजन्य रोग असून तो मांसाहारी प्राण्यांच्या जीवासाठी गंभीर धोका ठरू शकतो. ही बाब लक्षात घेऊन राज्यातील सर्व प्राणीसंग्रहालये आणि ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर्सना (टीटीसी) सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Nagpur News: कुटुंबाचा आधार असलेल्या तरुणाचा खून; अंबाझरीतील पहाटेची घटना ; दोन अल्पवयीन आरोपी ताब्यातसंसर्ग रोखण्यासाठी वन्यजीवांचे योग्य पोषण आणि त्यांचा ताणतणाव कमी करण्यावर भर दिला जात आहे. विशेषतः या केंद्रांमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रवेश रोखण्यासाठी कडक निर्बंध घालण्यात आले आहे. संरक्षक भिंती आणि प्रवेशद्वारांची तपासणी केली जात आहे.
बचाव केंद्रात नव्याने येणाऱ्या कोणत्याही वन्यजीवाचे आधी विलगीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्राण्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासोबतच त्यांच्या वर्तनातील बदलांवर लक्ष ठेवण्यासाठी चोवीस तास देखरेख यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
Premium|Child Abuse Awareness India : अस्वस्थ माता आणि धास्तावलेले बालपण; बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांनी समाजमन सुन्नवन्यप्राण्यांमध्ये कोणतीही असामान्य लक्षणे किंवा अचानक आजारपण आढळल्यास त्याची माहिती त्वरित वरिष्ठ कार्यालयाला कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जैवसुरक्षा आणि स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या असून, नियमित वैद्यकीय तपासणीवर भर दिला जात आहे. या प्रतिबंधात्मक उपायांमुळे शहरातील वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.