सोन्याचांदीचा आजचा भाव: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परकीय चलन वाचवण्यासाठी देशवासियांना पुढील एक वर्ष सोन्याची खरेदी न करण्याचे आवाहन केल्यानंतर, सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. काल 11 मे आणि आज १२ मे, मंगळवारी भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत किरकोळ घसरण दिसून येत आहे. जागतिक संकेत आणि स्थानिक मागणी कमी झाल्यामुळे ही कपात झाली आहे.तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलर मजबूत झाल्यामुळे आणि अमेरिका-इराणमधील अनिश्चिततेमुळे सोन्याच्या किमती नरमल्या आहेत. कालच्या तुलनेत आज २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम २२० रुपयांनी स्वस्त झाले आहे. याशिवाय, रविवारी हैदराबादमध्ये पंतप्रधान मोदींनी नागरिकांना सोने खरेदीबाबत संयम बाळगण्याचे जे आवाहन केले होते, त्याचाही परिणाम सोन्याच्या किमतीवर होताना दिसत आहे.(Gold-Silver Price Today)
दिल्ली
1,52,270 रु
१,३९,५९० रु
२२० रुपयांची घसरण
मुंबई
1,52,120 रु
१,३९,४४० रु
२२० रुपयांची घसरण
कोलकाता
1,52,120 रु
१,३९,४४० रु
२२० रुपयांची घसरण
चेन्नई
रु. 1,53,810
१,४०,९९० रु
५५० रुपयांची घसरण
बेंगळुरू
1,52,120 रु
१,३९,४४० रु
२२० रुपयांची घसरण
हैदराबाद
1,52,120 रु
१,३९,४४० रु
२२० रुपयांची घसरण
पुणे
1,52,120 रु
१,३९,४४० रु
२२० रुपयांची घसरण
अहमदाबाद
1,52,180 रु
१,३९,५९० रु
२०० रुपयांची घसरण
लखनौ
1,52,270 रु
१,३९,५९० रु
२२० रुपयांची घसरण
वरील दरांमध्ये GST आणि मेकिंग चार्जेस (घडणावळ) समाविष्ट नाहीत. किमतींच्या अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधू शकता किंवा ज्वेलरी ब्रँड्सच्या वेबसाइटला भेट देऊ शकता.
आज भारतात चांदीची किंमत २७४.९० रुपये प्रति ग्रॅम आणि २,७४,९०० रुपये प्रति किलो आहे. यामध्ये कालच्या तुलनेत प्रति किलो १०० रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे. दिल्ली, मुंबईकोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, पुणेवडोदरा, अहमदाबादमध्ये आज चांदीची किंमत प्रति १० ग्रॅम २,७४९ रुपये आणि प्रति किलो २,७४,९०० रुपये आहे. चेन्नईमध्ये या शहरांच्या तुलनेत किंमत थोडी जास्त आहे. तिथे १० ग्रॅम चांदीची किंमत २,८५१ रुपये, १०० ग्रॅमची किंमत २८,५१० रुपये आणि प्रति किलो २,८५,१०० रुपये आहे.
भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक सोने खरेदी करणारा देश आहे. देशात दरवर्षी सुमारे 700 ते 800 टन सोन्याची मागणी असते, तर देशांतर्गत उत्पादन अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे गरजेपैकी सुमारे 90 टक्के सोने आयात करावे लागते. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताने सुमारे 72 अब्ज डॉलर किमतीचे सोने आयात केले. हे मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 24 टक्क्यांनी अधिक आहे.
भारताचा परकीय चलन साठा सध्या सुमारे 690 अब्ज डॉलरच्या आसपास आहे. मात्र जागतिक अस्थिरता आणि वाढत्या आयातीमुळे त्यावर दबाव निर्माण झाला आहे. सोने आयातीसाठी मोठ्या प्रमाणावर डॉलर खर्च होतात. जर देशातील नागरिकांनी काही काळासाठी सोने खरेदी कमी केली, तर डॉलरची बचत होऊन परकीय चलन साठा मजबूत राहण्यास मदत होईल.
आणखी वाचा