दिल्लीत नीट 2026 पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांचा संताप उसळला असून शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा अर्थात NEET 2026 रद्द झाल्यानंतर देशभरात आंदोलनाची लाट निर्माण झाली आहे. दिल्लीतील परिसरात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर निदर्शने करत राष्ट्रीय परीक्षा संस्थे (NTA) विरोधात घोषणाबाजी, निदर्शने केली.
3 मे रोजी झालेल्या परीक्षेनंतर पेपरफुटीचे आरोप समोर आले होते. राजस्थानसह काही राज्यांमध्ये संशयास्पद हालचाली आढळल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) तपास सोपवण्यात आला. त्यानंतर NTA ने परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला.
या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे. अनेक विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा घेण्याच्या निर्णयाला विरोध करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. पोलीस दल विद्यार्थ्यांना आवरण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. दरम्यान, कथित पेपरफुटी रॅकेटमागील मुख्य आरोपींचा शोध घेण्यासाठी सीबीआयकडून तपास वेगाने सुरू आहे.