भ्रष्ट राजकारण्यांना हरवणारा ‘नायक’ आता सत्तेच्या खुर्चीवर; विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाची सातास
Marathi May 12, 2026 05:25 PM

Tamilnadu CM Vijay Thalapathy : तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलपती विजय आता राजकारणातही सुपरहिरो ठरत असून, तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यावर देश-विदेशातून शुभेच्छांचा (Tamilnadu CM Vijay Thalapathy) वर्षाव होत आहे. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुर कुमारा दिसानायके यांनी विजय यांचे अभिनंदन केल्यानंतर आता मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाने विधानसभा निवडणुकीत 108 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला. विजय यांच्या पक्षाला काँग्रेसचे 5 आमदार तसेच CPI, CPI(M), VCK आणि IUML या पक्षांच्या प्रत्येकी 2 आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे.(Tamilnadu CM Vijay Thalapathy)

मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी एक्सवर पोस्ट करत सी. जोसेफ विजय यांची तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. अनेक वर्षांपासून चाहते हे विजय यांना चित्रपटांमध्ये भ्रष्ट राजकारणी आणि विविध खलनायकांविरुद्ध लढताना पाहत आले आहेत. मात्र आता तमिळनाडूच्या जनतेने त्यांना पडद्यावरील भूमिकेपेक्षा अधिक मोठी जबाबदारी दिल्याचे त्यांनी म्हटले. मलेशियन पंतप्रधानांनी तमिळ भाषेतील “ओरु वायरल पुरची” ही म्हणही पोस्टमध्ये लिहिली आहे. याचा अर्थ “एका बोटाची क्रांती” असा होतो. मतदानाच्या ताकदीचा उल्लेख करत त्यांनी म्हटले की, एका बोटाच्या क्रांतीमुळे आता इतिहास घडण्याच्या उंबरठ्यावर आहे.(Tamilnadu CM Vijay Thalapathy)

मलेशिया आणि तमिळनाडू यांच्यात अनेक पिढ्यांपासून ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संबंध असल्याचेही अन्वर इब्राहिम यांनी नमूद केले. आगामी काळात मुख्यमंत्री विजय यांच्यासोबत काम करण्यास आपण उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.(Tamilnadu CM Vijay Thalapathy)

यापूर्वी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांनीही विजय यांना शुभेच्छा दिल्या होत्या. तमिळनाडू आणि श्रीलंका यांच्यात इतिहास, संस्कृती, व्यापार आणि लोकसंबंधांमुळे घट्ट नाते असल्याचे त्यांनी म्हटले होते. आर्थिक सहकार्य आणि नव्या संधींसाठी दोन्ही बाजूंना मोठी क्षमता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत TVK ने 108 जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले. विजय यांनी दोन मतदारसंघांतून विजय मिळवल्याने त्यांनी एक जागा रिक्त केली असून, सध्या पक्षाकडे 107 आमदार आहेत. काँग्रेसचे 5 आमदार, CPI, CPI(M), VCK आणि IUML चे प्रत्येकी 2 आमदार अशा एकूण 120 आमदारांचा पाठिंबा TVK सरकारला मिळाला आहे. याशिवाय AIADMK मधील एका गटानेही फ्लोअर टेस्टमध्ये विजय यांच्या सरकारला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.

Tamilnadu CM Vijay Thalapathy : मलेशियाच्या पंतप्रधानांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय?

तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मी माझे मित्र विजय यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. अनेक वर्षांपासून, त्यांच्या चाहत्यांनी त्यांना पडद्यावर भ्रष्ट राजकारणी आणि विविध खलनायकांचा तीन तासांत (मध्यंतरानंतर) पराभव करताना पाहिले आहे. आता तमिळनाडूच्या जनतेने विजय यांच्यावर पडद्यावरील कोणत्याही भूमिकेपेक्षा मोठी जबाबदारी सोपवली आहे. ‘ओरु विरल पुरत्ची’ (Oru Viral Puratchi) म्हणजेच ‘एका बोटाची क्रांती’ आता इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे.

मलेशिया आणि तमिळनाडूमध्ये पिढ्यानपिढ्या खोलवर ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आगामी काळात मुख्यमंत्री विजय यांच्यासोबत जवळून काम करण्यास मी उत्सुक आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.