सुप्रसिद्ध गायिकेमुळे सॅमसंग कंपनीच्या अडचणी वाढल्या; फक्त फोटोमुळे ठोकला 143 कोटींचा दावा
Marathi May 12, 2026 06:25 PM

पॉप स्टार दुआ लिपाने प्रसिद्धी हक्क कॉपीराइटसाठी सॅमसंगवर दावा दाखल केला: जगविख्यात ब्रिटिश पॉप स्टार दुआ लीपा (Pop Star Dua Lipa) म्हणजे, आजच्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कदाचितच कुणी असेल, जे दुआ लीपा हिला ओळखत नसेल. पण, सध्या ही जगप्रसिद्ध गायिका तिच्या कोणत्याही गाण्यामुळे नाहीतर, एका जगप्रसिद्ध कंपनीविरोधात तिनं जी कठोर पावलं उचललीत, त्यासाठी चर्चेत आली आहे. सु्प्रसिद्ध गायिकेनं प्रतिष्ठित सॅमसंग कंपनीवर (Samsung Company) कोट्यवधींचा खटला दाखल केला आहे. एवढंच काय तर, आपल्या परवानगीशिवाय फोटोचा वापर करून कंपनीने कोट्यवधींचा नफा कमावला आणि आपली फसवणूक केली, असा गंभीर आरोपही ब्रिटिश पॉप स्टार (British Pop Star) दुआ लीपा (Dua Lipa) हिनं सॅमसंग (Samsung) कंपनीवर केला आहे.

प्रसिद्ध ब्रिटिश पॉप स्टार दुआ लिपा (Famous British Pop Star Dua Lipa) आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिष्ठित कंपनी सॅमसंग यांच्यात कायदेशीर वाद उभा राहिला आहे. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सवर आपला फोटो बेकायदेशीरपणे वापरल्याचा आरोप करत, दुआ लिपा हिनं किमान 15 दशलक्ष डॉलर्सची (सुमारे 125 कोटी रुपये) नुकसानभरपाई मागण्यासाठी खटला दाखल केला आहे. पॉप स्टारचा असा आरोप आहे की, सॅमसंगनं आपला टीवी सेल्स वाढवण्यासाठी तिच्या लोकप्रियतेचा गैरवापर केलाय.

शुक्रवारी कॅलिफोर्नियाच्या फेडरल न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या खटल्यात असं नमूद करण्यात आलंय की, सॅमसंगनं आपल्या टेलिव्हिजन सेट्सच्या कार्डबोर्ड पॅकेजिंग बॉक्सवर दुआ लिपाचा, एक कॉपीराइट असलेला फोटो छापलाय. दुआ लिपाच्या वकिलांचं असं म्हणणं आहे की, असं करून कंपनीनं ग्राहकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलाय. जेणेकरून ग्राहकांना असं वाटावं की, खुद्द ही गायिकाच या उत्पादनाचं समर्थन करतेय.

बॉक्सवरील फोटोमुळे वाद का निर्माण झाला? (Dua Lipa Sued Samsung)

मीडिया रिपोर्टनुसार, या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या फोटोचं टायटल “Dua Lipa – Backstage at Austin City Limits, 2024” असं आहे. गायिकेचा दावा आहे की, या फोटोंशी संबंधित सर्व अधिकार आणि मालकी हक्क तिच्याकडेच आहेत. सॅमसंगनं हा फोटो वापरण्यापूर्वी ना तिची परवानगी घेतली, ना तिला कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई देऊ केली.

दुआ लिपानं सॅमसंगवर केवळ कॉपीराइट आणि ट्रेडमार्क उल्लंघनाचाच नव्हे, तर तिच्या ‘प्रसिद्धीच्या अधिकारांचं’ (Rights Of Publicity) उल्लंघन केल्याचाही आरोप केला आहे. हे कायदेशीर तत्त्व व्यक्तींना त्यांची ओळख, नाव किंवा प्रतिमेच्या व्यावसायिक वापराचं नियंत्रण करण्याचा अधिकार प्रदान करतं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Trisha Krishnan First Post After Thalapathy Vijay CM: थलपती विजय मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर तृषा कृष्णन हिची पहिली पोस्ट; म्हणाली, ‘प्रेम नेहमीच…’

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.