PM मोदींच्या आवाहनानंतर महाविकासआघाडीचे अनोखे आंदोलन; थेट घोड्यावरून काढली सवारी
Saam TV May 12, 2026 11:45 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाविरोधात शिवसेना शहरप्रमुख वसंत मोरे यांनी पुणे महापालिकेच्या नवीन इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ अनोखे आंदोलन केले. विशेष म्हणजे, वसंत मोरे यांनी घोड्यावर बसून आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.या आंदोलनामुळे परिसरात काही काळ लक्षवेधी वातावरण निर्माण झाले होते. कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहत आंदोलनाला पाठिंबा दिला.घोड्यावरून करण्यात आलेल्या या अनोख्या आंदोलनाची शहरात जोरदार चर्चा रंगली असून नागरिकांचेही याकडे लक्ष वेधले गेले. आंदोलनादरम्यान पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Politics : दोन पाटलांमध्ये कलगीतुरा, सांगलीत राजकीय राडा; सभापती निवडणुकीआधीच डायलॉग हाणला, इतिहासच काढला

तसेच पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन केल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आक्रमक झाला आहे. या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातबैलगाडी मोर्चा काढण्यात आला. पाचपाखाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) जिल्हा मध्यवर्ती कार्यालयापासून ठाणे महानगरपालिका मुख्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनाची खास बाब म्हणजे आमदार आव्हाड स्वतः घोड्यावर बसून मोर्चात सहभागी झाले होते.

खासगी शाळेतील शिक्षकांसाठी 'टीईटी' अनिवार्य; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

मोर्चादरम्यान “मोदी म्हणतात पेट्रोल-डिझेल कमी वापरा, आम्ही म्हणतो सत्ताधाऱ्यांनी TMT बसचा वापर करा” अशा आशयाचे बॅनर झळकावण्यात आले. यामधून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात आली. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, महिला अध्यक्षा मनीषा भगत, विरोधी पक्षनेते शानू पठाण, गटनेते अभिजित पवार यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ओव्हरटेकवरून वाद... नंतर रागाने पाहिलं, नागपूरात अभियांत्रिकी विद्यार्थ्याची भररस्त्यात चाकूने भोसकून हत्या

मोर्चा ठाणे महापालिकेत पोहोचल्यानंतर महापौर शर्मिला पिंपलोळकर यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये सत्ताधाऱ्यांनी स्वतः TMT बसने प्रवास करावा, अशी मागणी करण्यात आली. पाचपाखाडीहून निघालेल्या या अनोख्या मोर्चाची सांगता ठाणे महानगरपालिका मुख्यालयात झाली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.