Vastushastra : कर्जबाजारी झाला आहात? हातात पैसे टिकत नाहीत, मग सकाळी झोपेतून उठल्यानंतर आधी करा हे काम
Tv9 Marathi May 13, 2026 12:45 AM

वास्तुशास्त्रानुसार माणसाने नेहमी सूर्योदयापूर्वी झोपेतून जागं व्हावं. जे लोक सूर्योदयापूर्वी झोपेतून उठतात. अंघोळ करून देवपूजा करतात त्यांच्या आयुष्यात कधीही पैशांची कमी नसते, तसेच पहाटे झोपेतून उठण्याचे अजूनही अनेक फायदे आहेत. ज्या लोकांना पहाटे झोपेतून उठण्याची सवय असते, त्या लोकांचं आरोग्य उत्तम राहतं. दिवस चांगला जातो, तसेच घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहाते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. जर तुम्ही आर्थिक अडचणीत आहात, तुमच्यावर कर्ज झालं आहे? तुम्ही ते फेडण्याचा प्रयत्न करत आहात परंतु ते फिटत नाहीये, तर त्यासाठी वास्तुशास्त्रात काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. परंतु या ठिकाणी एक लक्षात ठेवा हे सर्व उपाय ब्रह्म मुहूर्तावरच करायचे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमके काय उपाय सांगण्यात आले आहेत?

तळहाताचे दर्शन घ्या – तुम्ही जेव्हा झोपेतून उठता तेव्हा तुमचे दोन्ही तळहात एकमेकांना एक पाच ते दहा सेंकद चोळा, त्यानंतर तळहाताचे दर्शन घ्या. लक्षात ठेवा यावेळी कराग्रे वसते लक्ष्मी या पूर्ण मंत्राचा जाप करा. हिंदू धर्मशास्त्रानुसार तुमच्या तळहाताच्या आग्रभागात लक्ष्मी माता, मध्य भागात सरस्वती माता आणि मूल भागात भगवान विष्णू यांचा वास असतो. जर तुम्ही नित्यनियमाने झोपेतून उठल्यानंतर हा प्रयोग केला तर आयुष्यात तुम्हाला कधी पैसा कमी पडणार नाही. चुंबकाप्रमाणे पैसा तुमच्या घराकडे आकर्षित होईल, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

तुळशीला जल अर्पण करा – तूळस हे भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांचं अत्यंत प्रिय झाड आहे. ज्या घरात तुळस असते, अशा घरामध्ये कधीही आयुष्यात पैशांची कमी भासत नाही. कारण त्या घरावर सदैव भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांचा आशीर्वाद असतो. त्यामुळे दररोज तुळशीची पूजा करावी असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. सकाळी अंघोळ केल्यानंतर तुळशीची पूजा करावी तसेच तुळशीला जल अर्पण करावं, या उपायामुळे तुमच्यावरील कर्ज हळुहळु कमी होत जातं, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

उंबऱ्यावर पाणी शिंपडा – तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो, त्यामधूनच नकारात्मक किंवा सरकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करत असते. त्यामुळे सकाळी अंघोळ झाल्यानंतर पाण्यामधे थोडं मीठ घालून हे पाणी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावर शिंपडावे, यामुळे सर्व प्रकारच्या वाईट नजरेपासून तुमच्या घराचं संरक्षण होतं, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.