कल्पेश गोविंद कोळी स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा : चर्चगेट, ठाणे केंद्र यांच्यात अंतिम लढत
esakal May 20, 2026 11:45 PM

मुंबई : ठाणे केंद्र आणि चर्चगेट केंद्राने उपांत्य सामन्यात पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर ३४ व्या एलआयसी कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता ठाणे विरुद्ध चर्चगेट केंद्र असा दोन दिवसांचा अंतिम सामना येत्या शुक्रवार आणि शनिवारी (२२ आणि २३ मे) रुईया कॉलेजसमोरील वीर मेजर रमेश दडकर मैदानात रंगेल.

माटुंगा जिमखाना येथे झालेल्या उपांत्य सामन्यात ठाणे सेंटरने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर एमसीए अकादमी केंद्रावर मात करत अंतिम फेरी गाठली. पहिल्या दिवशी एमसीए अकादमी केंद्राचा डाव १५५ धावांवर संपुष्टात आणल्यानंतर ठाणे केंद्राने दुसऱ्या दिवशी पहिला डाव ८ बाद ५०९ धावांवर घोषित केला.

दुसऱ्या दिवसाचा खेळ ९१/२ वरून पुढे सुरू करताना नीव जेठवानी याने १३७ चेंडूत १४३ धावांची शानदार खेळी केली. त्याच्या खेळीत १९ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. यष्टिरक्षक-फलंदाज तन्मय मालुसरे याने ९७ धावांची दमदार खेळी केली, मात्र त्याचे शतक अवघ्या ३ धावांनी हुकले. त्याचबरोबर सर्वेश भोईर (नाबाद ७२), आर्यन कुमार (नाबाद ५०), निरव भोरकर (४१), पार्थ राणे (३३), अथर्व गावडे (३२) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. एमसीए केंद्राकडून अर्जुन दादरकर आणि राजवीर लाड यांनी प्रत्येकी दोन विकेट्स टिपले. नीव जेठवानीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

डीपीसीसी, माटुंगा येथे झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात डावखुरा फिरकीपटू जय म्हात्रे याने सलग दुसऱ्या दिवशी हॅटट्रिक साजरी करत पाच विकेट्स मिळवत विरार केंद्राला दुसऱ्या डावात ८ बाद १८५ धावांवर रोखले. पहिल्या डावातही जय म्हात्रेने हॅटट्रिकसह सहा बळी टिपत विरार केंद्राचा १०१ धावांत खुर्दा उडवला होता. चर्चगेट केंद्राकडून कर्णधार आरुष कोल्हे (५८), शार्दूल फगारे (४९) आणि श्लोक बोंगू (४४) यांच्या खेळीमुळे पहिल्या डावात सर्वबाद २३१ धावा करत १३० धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती. त्याच आघाडीच्या बळावर चर्चगेट केंद्राने अंतिम फेरीत कूच केली. सामन्यात ११ बळी मिळवणारा जय म्हात्रे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

उपांत्य फेरी – दुसरा दिवस
  • स्थळ : माटुंगा जिमखाना

  • ठाणे सेंटर विरुद्ध एमसीए अकादमी सेंटर

  • नाणेफेक : ठाणे सेंटरने क्षेत्ररक्षण स्वीकारले

  • एमसीए अकादमी सेंटर : ४९.१ षटकांत सर्वबाद १५५

  • * मोक्षा शाह ६७* (८२ चेंडू, ९ चौकार, २ षटकार)

  • * तनमय महन्सारिया (SLA) ५/३३

  • * आर्यन कुमार (RAM) २/२५

  • ठाणे सेंटर : २६ षटकांत ५०९/८ घोषित

  • * नीव जेठवानी १४३ (१३७ चेंडू, १९ चौकार, ४ षटकार)

  • * तनमय मालुसरे ९७ (१०८ चेंडू, १० चौकार, ३ षटकार)

  • * सर्वेश भोईर ७२*

  • * आर्यन कुमार ५०*

  • * निरव भोरकर ४१

  • * पार्थ राणे ३३

  • * अथर्व गावडे ३२

  • * पार्थ नलावडे २/८२

  • * अर्जुन दादरकर २/११७

  • * राजवीर लाड २/१३६

  • पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर ठाणे सेंटर अंतिम फेरीत.

  • स्थळ : डीपीसीसी, माटुंगा

  • विरार सेंटर विरुद्ध चर्चगेट सेंटर

  • नाणेफेक : चर्चगेट सेंटर

  • विरार सेंटर :

  • पहिला डाव – ३६.४ षटकांत सर्वबाद १०१

  • * सैफ अली ३८

  • * जय म्हात्रे ६/११

  • दुसरा डाव – ५० षटकांत १८५/८

  • * जय म्हात्रे ५/४१ (हॅट्ट्रिकसह)

  • चर्चगेट सेंटर : ७४.२ षटकांत सर्वबाद २३१

  • * आरुष कोल्हे ५८

  • * शार्दूल फगारे ४९

  • * श्लोक बोंगू ४४

  • * प्रेरित राऊत ४/२७

  • * हार्दिक गजमल २/४९

  • * गोलू पाल २/४४

  • * प्रवीर सिंग २/६४

  • पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर चर्चगेट सेंटरने अंतिम फेरीत प्रवेश केला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.