Forest Guards Unpaid: घेरा सिंहगडच्या सुरक्षारक्षकांचे वेतनाविना हाल; वन समितीकडे वारंवार पाठपुरावा करावा लागत असल्याचा आरोप
esakal May 21, 2026 04:45 AM

खडकवासला : घेरा सिंहगड संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या सुरक्षारक्षकांना गेल्या तीन वर्षांपासून वेतनासाठी वारंवार पाठपुरावा करावा लागत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. एप्रिल महिन्याचे वेतन अद्याप मिळाले नसल्याने समितीतील ३५ कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून, त्यांनी कामगार आयुक्त, पुणे उपवनसंरक्षक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडे वेळेत वेतन देण्याची मागणी केली आहे.

समितीचे सुरक्षारक्षक गेली १८ वर्षे घेरा सिंहगड परिसरात वनसंवर्धन, एक तारखेला वेतनाचा धनादेश काढला जातो आणि १० तारखेच्या आत वेतन दिले जाते. मात्र, अध्यक्ष वेळेत सही करत नसल्याने वेतन वितरणाला विलंब होतो. ही बाब कार्यकारिणी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

- समाधान पाटील, सचिव, वनव्यवस्थापन समिती, घेरा सिंहगड

वनवा प्रतिबंध, बेकायदा वृक्षतोड रोखणे, सिंहगड घाटातील वाहतूक नियंत्रण तसेच पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र मागील तीन वर्षांपासून त्यांना हक्काच्या वेतनासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार गाऱ्हाणे मांडल्यानंतरच वेतन दिले जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

अनेकदा दोन ते तीन महिन्यांच्या विलंबानंतर वेतन मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय, अनेक वर्षे नियमित सेवा करूनही कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी (पीएफ), अपघात विमा योजना तसेच इतर कल्याणकारी सुविधा देण्यात आलेल्या नसल्याची तक्रारही त्यांनी केली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.