आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 66 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या हंगामातील 14 वा आणि शेवटचा सामना असणार आहे. तसेच दोन्ही संघांची या हंगामात आमनेसामने येण्याची दुसरी वेळ असणार आहे. गुजरातने प्लेऑफचं तिकीट मिळवलंय. मात्र त्यानंतरही गुजरातसाठी हा सामना टॉप 2 च्या हिशोबाने निर्णायक असणार आहे. तर चेन्नईला प्लेऑफमधील जर तरचं आव्हान राखण्यासाठी विजयी होणं बंधनकारक आहे. त्यामुळे चेन्नई जिंकणार की गुजरात आणखी 2 गुण मिळवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निमित्ताने उभयसंघातील सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना कधी?गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना गुरुवार 21 मे रोजी होणार आहे.
गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना कुठे?गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.
गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.
गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल. तर मोबाईलवर लाईव्ह मॅच जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहता येईल.
चेन्नई-गुजरात दुसऱ्यांदा आमनेसामनेचेन्नई-गुजरात दोन्ही संघांची ही या हंगामात आमनेसामने येण्याची दुसरी वेळ असणार आहे. याआधी उभयसंघात 26 एप्रिलला आमनासामना झाला होता. तेव्हा गुजरातने चेन्नईवर 8 विकेट्स विजय मिळवला होता. त्यामुळे आता चेन्नईकडे या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला गुजरातसाठी प्लेऑफमध्ये पोहचल्यानंतरही हा सामना महत्त्वाचा आहे. गुजरातला टॉप 2 मध्ये कायम राहण्यासाठी हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. टॉप 2 मध्ये असणाऱ्या संघांना अंतिम फेरीत पोहचण्याची 2 संधी मिळते. त्यामुळे कायमच टॉप 2 साठी चुरस असते. त्यामुळे गुजरात सामना जिंकून टॉप 2 मध्ये कायम राहणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.