IPL 2026 KKR Playoff Scenario: कोलकाता नाइट रायडर्सने विजय मिळवला, पण अजूनही लक्ष्य दूरच; Mumbai Indians, लखनौच्या हाती सारी सूत्र; जाणून घ्या गणित
esakal May 21, 2026 04:45 AM

KKR playoff qualification scenario after beating Mumbai Indians : कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये बुधवारी मुंबई इंडियन्सवर विजय मिळवून स्वतःला प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राखले. MI चे १४८ धावांचे लक्ष्य KKR ने सहज पार केले. हे लक्ष्य त्यांनी १३.३ षटकांत पार केले असते तर ते नेट रन रेटमध्ये पंजाब किंग्सला मागे टाकू शकले असले. पण, तसे न झाल्याने आता त्यांना प्ले ऑफसाठी Mumbai Indians आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्या मदतीची गरज लागणार आहे. KKR ने १३ सामन्यांत १३ गुणांची कमाई केली आहे. MI चा हा १३ सामन्यांतील नववा पराभव ठरला.

मुंबईने ४ फलंदाज ४१ धावांवर गमावल्यानंतर चांगले पुनरागमन केले. तिलक वर्मा ( २०) व हार्दिक पांड्या ( २६) यांच्या ४३ धावांच्या भागीदारीने MI चे मनोबल वाढवले. विल जॅक्स ( १४) दुर्दैवीरित्या रन आऊट झाल्यामुळे, मुंबईला आणखी धावा करता आल्या नाही. मात्र, कॉर्बिन बॉशने १८ चेंडूंत ३२ धावांची नाबाद खेळी करताना ३ चौकार व २ षटकार खेचले. दीपक चहरसोबत ( १०) त्याने ४२ धावा जोडल्या आणि संघाला ८ बाद १४७ धावांपर्यंत घेऊन गेला. कॅमेरून ग्रीन, सौरभ दुबे व कार्तिक त्यागी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

KKR vs MI Live: दीपक चहरने कोलकाताच्या फॅन्सना डिवचले; Finn Allen ची विकेट, सूर्याला थांब म्हणाला अन् पुढे काय केले ते पाहाच Video

KKR ची सुरुवात काही खास झाली नाही आणि फिन अॅलन ( ८), कॅमेरून ग्रीन ( ४) व अजिंक्य रहाणे ( २१) यांच्या विकेट्समुळे त्यांची अवस्था ३ बाद ५४ अशी झाली. कॉर्बिन बॉशने दोन धक्के दिले. मनिष पांडे व रोव्हमन पॉवेल ही जोडी मैदानावर उभी राहिली आणि त्यांनी ४८ चेंडूंत ६४ धावा जोडून KKR ला विजयाच्या मार्गावर आणले. पण, ते १३.३ षटकांचे गणित सोडवू शकले नाही. मनिष ३३ चेंडूंत ४५ धावांवर जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.

पाठोपाठाव पॉवेलही ३० चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४० धावांवर झेलबाद झाला. बॉशने अफलातून झेल घेतला. KKR ने सुरुवातीला अंगकृश रघुवंशीला कन्कशन बदली खेळाडू म्हणून रमणदीप सिंगचे नाव जाहीर केले होते, पंरतु प्रत्यक्षात तेजस्वी दहिया ( Tejasvi Dahiya ) फलंदाजीला आला. KKR ला अजूनही २८ चेंडूंत २४ धावांची गरज होती. तेजस्वी ११ धावांवर बाद झाला आणि रायन रिकल्टनने अफलातून झेल टिपला. इथेही दीपक चहल खोडा घालायला आला होता. पण, रिकल्टनने चेंडूवरील ताबा सोडला नाही. KKR ला १३ चेंडूंत ८ धावा अजून हव्या होत्या. KKR ने १८.५ षटकांत ४ विकेट्स राखून ही मॅच जिंकली.

KKR vs MI Live: ना तुला, ना मला... दीपक चहर अन् रॉबिन मिंझ यांची 'पाकड्यां'सारखी फिल्डींग; हार्दिक पांड्यावर तोंड लपवण्याची वेळ Video What KKR need to qualify for IPL 2026 playoffs?

KKR ला प्ले ऑफच्या शर्यतीत नेट रन रेटच्या बाबतीतही पंजाब किंग्सच्या पुढे जाण्यासाठी हा सामना १३.३ षटकांत जिंकणे आवश्यक होता. पंजाब किंग्सला ( ०.२२७) नेट रन रेटमध्ये मागे टाकण्यासाठी KKR ला केवळ विजय पुरेसा नव्हता. या सामन्यातपूर्वी कोलाकाताचा नेट रन रेट हा -०.०३८ असा होता. पण, KKR ने ही संधी गमावली आणि त्यामुळे त्यांना आता मुंबई इंडियन्स व लखनौ सुपर जायंट्सवर अवलंबून रहावे लागणार आहे.

KKR ने १३ सामन्यांत ६ विजय व एक ड्रॉ सामन्यासह १३ गुणांची कमाई करून IPL 2026 Point Table मध्ये सहाव्या क्रमांकावर झेप घेतली. पंजाब किंग्सच्या खात्यातही १३ गुण आहेत, परंतु त्यांचा नेट रन रेट चांगला आहे. RCB, GT, SRH हे तीन संघ प्ले ऑफमध्ये पोहोचले आहेत. राजस्थान रॉयल्स १४ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांचा शेवटचा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे.

KKR vs MI Live: रोहित शर्माचा 'काटा' काढला, सूर्यकुमारचा त्रिफळा उडवला... कोण आहे विदर्भचा स्पीडस्टार सौरभ दुबे? Video

हा सामना मुंबईने जिंकल्यास KKR चा फायदा होईल. त्याचवेळी पंजाबचा लखनौ सुपर जायंट्सकडून पराभव KKR ला हवा आहे. हे दोन्ही समीकरण जुळल्यास कोलकाताला त्यांचा शेवटचा साखळी सामना ( वि. दिल्ली कॅपिटल्स) जिंकावा लागेल आणि ते १५ गुणांसह प्ले ऑफमध्ये जातील.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.