Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच
Marathi May 22, 2026 04:25 AM

Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच

जून महिन्यात होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत खरी चुरस ही जागावाटपातच रंगणार असल्याचं आता दिसू लागलंय. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यात. त्यामुळे विधान परिषदेच्या अधिकाधिक जागांवर भाजपचा दावा असणार, हे अपेक्षित आहे. मात्र भाजपचं संख्याबळ अधिक असणाऱ्या काही जागांवर शिवसेनेनं दावा केल्यामुळं महायुतीत जागावाटपाचा पेच वाढण्याची चिन्हं आहेत.महाराष्ट्रात येत्या जून महिन्यात विधान परिषद निवडणुकीचा आखाडा रंगणार आहे.एकूण १७ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी महायुतीत सध्या जोरदार रस्सीखेच सुरु आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सध्याचं संख्याबळ बघता भाजपचं पारडं चांगलंच जड आहे. त्यामुळं १७ पैकी भाजपच्या वाट्याला १२ जागा, शिवसेनेच्या वाट्याला ३ जागा आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला २ जागा असं प्राथमिक सूत्र समोर येतंय. मात्र शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना हे सूत्र मान्य नाही. नेमक्या कुठल्या जागांसाठी ही रस्सीखेच होऊ शकते, याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट..

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.