Dhurandhar Singer Jasmine Sandlas Concert Accident: भारतीय-पंजाबी गायिका (Indian Punjabi singer) जस्मिन सँडलस (Jasmine Sandlas) 'धुरंधर' (Dhurandhar) आणि 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar The Revenge) हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर अनेक म्युझिक कॉन्सर्ट्समध्ये (Music Concerts) दमदार परफॉर्मन्सनं सर्वांना वेड लावते. तिच्या कॉन्सर्टला तरुण-तरुणाईची झुंबड उडते. जस्मिन आपल्या दमदार परफॉर्मन्सनी कॉन्सर्टला चार चाँद लावते. पण, नुकत्याच पार पडलेल्या तिच्या देहरादूनच्या कॉन्सर्टमध्ये (Dehradun Concert) मात्र, फारच भयंकर घटना घडली, ज्यामुळे तिची कॉन्सर्ट अचानक थांबवावी लागली. याचं कारण म्हणजे, कार्यक्रमाच्या ठिकाणी निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती.
मीडिया रिपोर्टनुसार, जस्मिन स्टेजवर परफॉर्मन्स सादर करण्यासाठी आली आणि ती परफॉर्मन्स सुरू करणार एवढ्यात खाली ऑडियन्समध्ये लावलेले बॅरिकेड्स एका झटक्यात कोसळले. यामुळे पुढच्या रांगेत उभे असलेल्या प्रेक्षकांचा तोल गेला आणि ते खाली पडले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे जस्मिननं कॉन्सर्ट तात्काळ थांबवली. या घटनेनंतर, जस्मिननं मंचावरूनच उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांना तात्काळ त्यांना मदत करण्याचं आवाहन केलं. तिनं त्यांना परिस्थितीवर व्यवस्थित हाताळण्याची आणि गर्दीतील प्रत्येक व्यक्ती सुरक्षित राहील आणि त्यांची योग्य ती काळजी घेतली जाईल, याची खात्री करण्याची विनंती केली.
सुरक्षा पथकाला परिस्थिती काळजीपूर्वक हाताळण्याचं आवाहन
उपस्थितांना उद्देशून बोलताना, जस्मिननं सुरक्षा पथकाला ही परिस्थिती अत्यंत सावधगिरीनं आणि संवेदनशीलतेनं हाताळण्याचं आवाहन केलं. कार्यक्रमात आलेल्या व्यत्ययाबद्दल तिनं प्रेक्षकांची माफी मागितली आणि आपल्या टीमला, कोणालाही दुखापत होणार नाही याची खात्री करण्याबाबत विशेष सूचना दिल्या. मैफिल पुन्हा सुरू होण्यापूर्वी, तिनं आपल्या प्रेक्षकांच्या हितासाठी आणि सुरक्षिततेसाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत, हे पुन्हा पुन्हा सांगितलं.
View this post on Instagram
अचानक झालेल्या अपघातानं गायिका पुरती हादरली, स्टेजवरुनच देवाचा धावा करू लागली
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की, अचानक झालेल्या अपघातामुळे गायिका हादरुन गेलेली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाही, ती वारंवार 'वाहेगुरू', 'वाहेगुरू' असा जप करत होती. अपघात होताच तिनं थेट आपल्या टीमला आवाहन केलं आणि म्हणाली की, "या संपूर्ण प्रकरणाची सूत्रे माझ्या संपूर्ण टीमने हाती घ्यावीत, अशी माझी इच्छा आहे..."
जस्मिन म्हणाली, "मित्रांनो, हे सर्व घडत असल्यामुळे मला मनापासून दुःख झालंय. माझी टीम ही परिस्थिती हाताळू शकेल का? या प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी माझ्या टीमनं स्वतःच्या हाती घ्यावी, असं मला वाटतंय. येथील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक आहे. माझ्या टीमनं या समस्येवर त्वरित तोडगा काढावा, अशी माझी अपेक्षा आहे..."
पंजाबी संगीतातील 'पिंक क्वीन' म्हणून ओळखली जाते जस्मिन
जस्मिन सँडलस, 'धुरंधर' या गाजलेल्या गाण्यातील गायिका, ही एक प्रख्यात भारतीय-अमेरिकन गायिका, संगीतकार आहे. प्रामुख्यानं पंजाबी संगीत क्षेत्र आणि बॉलिवूडमधील आपल्या अप्रतिम गाण्यांसाठी ती ओळखली जाते. तिच्या गायनाची अद्वितीय शैली आणि तिचे बिनधास्त व्यक्तिमत्त्व यामुळेच, तिला प्रेमानं 'पंजाबी संगीताची पिंक क्वीन' असंही संबोधलं जातं.
ABP माझाच्या बातम्या LIVE...