राज्यभरात इंधन टंचाईचं संकट अधिक गडद! पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा, खरिपाच्या तोंडावर बळीराजा दुबार संकटात
एबीपी माझा वेब टीम May 22, 2026 10:13 AM

Maharashtra Petrol Diesel Shortage : एकीकडे राज्यात पेट्रोल-डिझेलसाठी रांगा पाहायला मिळतायत. पण दुसरीकडे याच रांगांवरून राजकारणही रंगतंय. पण या सगळ्यात नाहक त्रास सहन करावा लागतोय तो सर्वसामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांनाच. असं असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र देशात पुरेसा (Fuel Shortage) इंधनसाठा असल्याचं विधान केलं. तर सरकारमधील काही मंत्र्यांनी इंधनटंचाईला साठेबाजी जबाबदार असल्याचं म्हटलंय. असं असलं तरी या साऱ्यामुळे राज्यभरात इंधन टंचाईचे भीषण संकट अधिक तीव्र होताना दिसत आहे. आधीच निसर्गाच्या लहरीपणानं हैराण झालेला बळीराजा आता पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या (Petrol- Diesel Shortage) नव्या संकटामुळे पुरता हतबल झाला आहे. राज्यात अनेक भागात डिझेल मिळत नसल्यानं ट्रॅक्टर बंद पडलेत. ज्याच्याकडे डिझेल इंजिननं पाणीउपसा होतो त्यांना आता पिकांना पाणी देता येत नाहीये. तर शेतमाल बाजारात नेण्यासाठीही शेतकऱ्यांची फरफट सुरू आहे. सरकारच्या नियोजनाच्या अभावाचा सर्वात मोठा फटका पुन्हा एकदा बळीराजालाच बसतोय. (Maharashtra Petrol Diesel Shortag)

Marathwada Petrol Diesel Shortag: मराठवाडा 'दुष्काळवाडा', टँकरवाडा ते डिझेलचा तुटवडा

कधीकाळी मराठवाड्यातील गावागावात पाण्यासाठी रात्र जागून काढण्याची वेळ यायची. विहिरी, टँकर आणि हंडाभर पाण्यासाठी रांगा लागायच्या. पण काळ बदलला आणि आता तीच रात्र जागून काढण्याची वेळ डिझेलसाठी आली आहे. शेतकऱ्यांच्या अंगणात पाण्यासाठी ठेवलेले कॅन आज डिझेलने भरले जात आहेत. डिझेल तुटवड्यामुळे (Petrol- Diesel Shortage)मराठवाड्यात शेतकरी आणि वाहनचालकांवर मोठं संकट ओढवलं आहे. एकेकाळी पाण्यासाठी रांगा लावणारा मराठवाडा. आज डिझेलसाठी रात्र जागून काढतोय. पाण्याच्या हंड्यांची जागा आता डिझेलच्या कॅननी घेतली आहे. आणि हा संघर्ष फक्त इंधनाचा नाही. तर शेती, रोजगार आणि ग्रामीण जीवन वाचवण्याचा आहे.

Petrol- Diesel Shortage:  डीझल मिळवण्यासाठी पेट्रोल पँपावर भरली जत्रा

आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता भंडाऱ्यातील शेतकऱ्यांनाही बसू लागला आहे.  वाशिममध्ये सातव्या दिवशीच्या मध्यरात्री शेतकरी आणि वाहनचालकांची डीझल मिळवण्याकरिता जत्रेच स्वरूप पाहवयास मिळालंय. आज दिवसभरात विविध पँपावर चकरा मारू डीझल न मिळाल्याने रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांनी गर्दी केल्याचं चित्र पाहवयास मिळालं.

इंधन बचतीसाठी नंदुरबार जिल्हा परिषदेचा पुढाकार; प्रत्येक सोमवारी 'नो व्हेईकल डे' राहणार 

देशात इंधन टंचाईची परिस्थिती निर्माण होत असताना इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी नंदुरबार जिल्हा परिषद पुढे सरसावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, आठवड्याच्या पहिल्या दिवशी अधिकारी आणि कर्मचारी सायकल तसेच दुचाकीचा वापर करून कार्यालयात येणार आहेत. 

Nandurbar: इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; इंधन साठवणूक करणाऱ्या नागरिकांवर कारवाई

नंदुरबार जिल्ह्यात इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आता सतर्क झाले आहे. इथून पुढे बाटल्या आणि ड्रममध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. इंधन साठवणूक करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. पेट्रोलसाठा असूनही पंप बंद ठेवणाऱ्यांची देखील चौकशी होणार आहे. तर यात दोषी पेट्रोल पंप चालकांवर कायदेशीर कारवाई होणार असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील सुरू असलेल्या पंपांवर नागरिकांची वाढती गर्दी लक्ष्यात घेता अत्यावश्यक सेवांसाठी इंधन राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. पेट्रोल कंपन्यांसोबत प्रशासनाची देखील बैठक घेण्यात येत आहे. लवकरच इंधन पुरवठा सुरळीत होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून आवाहन करण्यात आले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.