'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याकडे आणखी एक गूड न्यूज; आधी मुंबईत तिसरं घर घेतलं अन् आता... VIDEO
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क May 22, 2026 10:13 AM

Anshuman Vichare Buys New Car: मुंबईत (Mumbai News) आपलं हक्काचं घर आणि त्यासोबतच स्वतःच्या मालकीची एक गाडी असावी, असं एक स्वप्न आपल्यापैकी प्रत्येकजण पाहतं. त्यासाठी प्रत्येकजण जीवापाड मेहनत करतो. यंदाच्या वर्षात अनेक सेलिब्रिटींनी आपली स्वप्न पूर्ण केलीत. अशातच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra Show) फेम एका मराठमोळ्या अभिनेत्यानंही (Marathi Actor) असंच एक स्वप्न पाहिलेलं आणि ते सत्यातही उतरवलंय. मराठी अभिनेता अंशुमन विचारे यानं नुकतंच मुंबईत आपलं तिसरं घर घेतलं होतं. काही दिवसांपूर्वीच नव्या घरात गणेश पूजन करुन अभिनेत्याचं कुटुंब तिथे शिफ्टही झालं. अशातच आता अभिनेत्यानं आणखी एक गूड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अभिनेत्यानं आपलं आणखी एक स्वप्न सत्यात उतरवतं नवीकोरी इलेक्टिक गाडी घेतली आहे. त्यानं इन्स्टाग्रामवरुन व्हिडीओ शेअर करुन आपल्या नव्या गाडीची झलकही चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

सूंपर्ण महाराष्ट्राला (Maharashtra News) खळखळून हसवणारा शो म्हणजे, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra). या शोमधून घराघरांत पोहोचलेला मराठमोळा अभिनेता (Marathi Actor) अंशुमन विचारे (Anshuman Vichare) नेहमीच चर्चेत असतो. तो त्याचे वेगवेगळे अनुभव, व्हिडीओच्या माध्यमातून शेअर करत असतो. तसेच, त्याची पत्नी पल्लवी विचारे (Pallavi Vichare सुद्धा सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह असते. गुढिपाडव्याच्या मुहूर्तावर अंशुमन विचारे (Anshuman Vichare Third Home In Mumbai) आणि त्याची पत्नी पल्लवी हिनं नवं घर घेतल्याची गूड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केलेली. अशातच आता या जोडप्यानं एक नवी गाडी घेतल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यानं नव्या गाडीची पहिली झलकसुद्धा चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अंशुमन विचारे यानं Mahindra XEV 9e ही जवळपास 30 लाख किंमतीची इलेक्ट्रिक गाडी घेतली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Adv Pallavi Vichare (@pallavi_a_vichare)

आपल्या इन्स्टा अकाउंटवरुन त्यानं नव्या गाडीचा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच, अभिनेत्यानं या व्हिडीओसोबत एक कॅप्शनही लिहिलंय. "New addition in the family...", असं अभिनेत्यानं म्हटलंय. अंशुमन विचारेच्या इन्स्टा पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत अभिनंदन केलं आहे. 

दरम्यान, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' यांसारख्या लोकप्रिय कार्यक्रमांमधून घराघरांत पोहोचलेला विनोदवीर म्हणजे, अभिनेता अंशुमन विचारे. तसंच, त्यानं अनेक सिनेमांमधून काम करत आपल्या अभिनयाची छापही चाहत्यांच्या मनावर उमटवली. आता लवकरच तो 'तुंबाडची मंजुळा' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Anshuman Vichare Third Home In Mumbai: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्यानं मुंबईत घेतलं हक्काचं तिसरं घर; पत्नीनं VIDEO शेअर करुन दाखवली झलक

ABP माझाच्या बातम्या LIVE...

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.