Anupriya Goenka: ‘पद्मावत’ आणि ‘वॉर’सारख्या चित्रपटांत झळकलेली अभिनेत्री अनुप्रिया गोएंका सध्या तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने वेश्याव्यवसायाबद्दल आपले मत व्यक्त करताना त्याला 'सोशल सर्व्हिस' असे म्हटले. तिच्या या विधानानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली असून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
फिल्मी ज्ञानला दिलेल्या मुलाखतीदरम्यान अनुप्रियाने सांगितले की, समाजात अनेक पुरुष कामानिमित्त किंवा इतर कारणांनी कुटुंबापासून दूर राहतात. अशा परिस्थितीत काही महिला त्यांच्या भावनिक आणि शारीरिक गरजा पूर्ण करतात आणि त्या अर्थाने त्या एक सामाजिक भूमिका निभावत असतात. सेक्स वर्ककडे केवळ चुकीच्या नजरेतून पाहण्याऐवजी मानवी भावना आणि वास्तव समजून घेण्याची गरज आहे. माझ्यामते या महिला सोशल सर्व्हिस करत आहेत.
Vidyadhar Joshi: 'सोनं खरेदी करणं म्हणजेच विनोद'; मोदींच्या आवाहनावर प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची मार्मिक पोस्टतिने पुढे असेही म्हटले की, एखादी महिला स्वतःच्या इच्छेने हा व्यवसाय करत असेल, तर त्याकडे इतर व्यवसायांप्रमाणेच पाहिले जावे. मात्र जबरदस्ती, शोषण किंवा महिलांवर अन्याय होत असेल, तर त्याला कठोर विरोध झाला पाहिजे.
Hardik Pandya Marriage: हार्दिक पंड्या 'या' तारखेला गर्लफ्रेंड महिका शर्मासोबत करणार लग्न? व्हायरल पोस्टमागील नेमकं सत्य काय?या विधानामुळे काही नेटिझन्सन अनुप्रियावर टीका करत “अशा गोष्टींचे समर्थन करणे चुकीचा संदेश देणारे आहे” असे नेटकरी म्हणत आहेत. अनेकांनी वेश्याव्यवसायात महिलांना अनेकदा परिस्थितीमुळे ढकलले जाते, त्यामुळे त्याला “सोशल सर्व्हिस” म्हणणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया दिली. तर दुसरीकडे काहींनी अनुप्रियाचे समर्थन करत, समाजात दुर्लक्षित विषयांवर खुलेपणाने बोलण्याचे धाडस तिने दाखवले असल्याचे म्हटले आहे.
View this post on Instagram
या विधानावर सोशल मीडियावर अनेक नेटकरी या अभिनेत्रीला मोठ्या प्रमाणावर 'ट्रोल' करत आहेत. काहींनी असा युक्तिवाद केला की, वेश्याव्यवसायासारख्या गोष्टीला "समाजसेवा" असे संबोधल्याने हा दिशाभूल करणारा संदेश जातो. दरम्यान, इतर अनेक नेटकऱ्यांनी या गोष्टीवर भर दिला की, अनेक स्त्रिया केवळ नाइलाजाने किंवा दबावाखाली येऊनच या व्यवसायात उतरतात; त्यामुळे या गोष्टीचे सामान्यीकरण केले जाऊ नये.
दुसरीकडे, काही लोक अनुप्रियाच्या समर्थनासाठीही पुढे आले. त्यांनी असा युक्तिवाद केला की, या अभिनेत्रीने एका अशा सामाजिक मुद्द्याला हात घातला आहे, ज्यावर लोक अनेकदा उघडपणे चर्चा करण्यास कचरतात. सध्या, अनुप्रियाचे हे विधान सोशल मीडियावर चर्चेचा मोठा विषय बनला आहे.