Delhi Riots Case: उमर खालीदला दिलासा! दिल्ली उच्च न्यायालयाकडून तीन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर
esakal May 22, 2026 06:45 PM

दिल्ली दंगल प्रकरणातील आरोपी उमर खालिदला दिल्ली उच्च न्यायालयाने तीन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने काही अटी-शर्तींसह हा निर्णय दिला आहे. १ ते ३ जून तारखेपर्यंत हा जामीन लागू राहणार आहे. न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंग आणि न्यायमूर्ती मधू जैन यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला.

उमर खालिदच्या आईवर शस्त्रक्रिया होणार असल्याने त्यांना भेटता यावे, यासाठी ही सवलत देण्यात आल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. २०२० मध्ये उत्तर-पूर्व दिल्लीत झालेल्या दंगलीप्रकरणी उमर खालिदवर आरोप ठेवण्यात आले असून तो सध्या तुरुंगात आहेत. यापूर्वी ५ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. मात्र, मानवी दृष्टिकोनातून विचार करून ही तात्पुरती सवलत देण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

एल्गार परिषद प्रकरणात नवा ट्विस्ट! कोर्टाचा वरवरा राव यांना झटका; हैदराबादला स्थलांतराची मागणी फेटाळली

न्यायालयाने उमर खालिदला एक लाख रुपयांचा वैयक्तिक हमीदार देण्याचे निर्देश दिले असून या कालावधीत त्याला केवळ रुग्णालयात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच तो राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच राहील, असेही न्यायालयाने सांगितले आहे.

Wildlife Crime: शिकार करणाऱ्याला जामीन नाहीच; उच्च न्यायालयाचा आंतरराज्यीय टोळीला दणका

दरम्यान, फेब्रुवारी २०२० मध्ये सीएए आणि एनआरसीविरोधी आंदोलनादरम्यान उत्तर-पूर्व दिल्लीत मोठे दंगे उसळले होते. या प्रकरणात अनेक जणांवर मोठ्या कटाचा आरोप असून त्यांची चौकशी सुरू आहे. उमर खालीदवरही हे आरोप करण्यात आले आहेत. यापूर्वी अनेकदा त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.