5 अफेअर, 2 लग्न तरीही नरकासमान अभिनेत्रीचं आयुष्य… पहिल्या नवऱ्याने बेदम मारलं, दुसऱ्याने तर…, तिच्या जीवनाची गडद रहस्ये
Tv9 Marathi May 22, 2026 05:45 PM

हिंदी सिनेविश्वातील बोल्ड अभिनेत्रीचं प्रोफेशनल आयुष्य दमदार होतं. पण तिच्या खासगी आयुष्यात अनेक अडचणी होत्या. अभिनेत्रीचे पाच सेलिब्रिटींसोबत अफेअर होतं. तर दोन वेळा तिने लग्न केलं. पण अभिनेत्रीने खासगी आयुष्यात बऱ्यात अडचणी भोगल्या. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) आहेत. झीनत अमान यांचं अनेकांसोबत नाव जोडण्यात आलं. देव आनंद यांच्यासोबत देखील त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा होत्या. एवढंच नाही तर, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्यासोबत देखील झीनत अमान रिलेशनशिप असल्याच्या चर्चांनी एकेकाळी जोर धरलेला. पण याचा झीनत अमान यांनी कधीच स्वीकार केला नाही.

पहिल्या नवऱ्याकडून मारहाण…

संजय खान याच्यासोबत असलेलं नातं झीनत अमान यांनी गुपित ठेवलं आणि गुपचूप लग्न देखील केलं. तेव्हा संजय खान विवाहित होते. अशात झीनत आणि संजय यांचं नातं एक वर्ष देखील टिकलं नाही. असं देखील सांगितलं जातं की, एकदा हॉटेलच्या खोलीत संजय यांनी झीनत यांना बेदम मारलं. तेव्हा त्यांच्यासोबत पहिली पत्नी देखील होती.

दुसऱ्या लग्नानंतर भोगल्या अनेक यातना…

संजय खानपासून विभक्त झाल्यानंतर, झीनत यांनी मजहर खानशी लग्न केलं, लग्नानंतर त्यांनी दोन मुलांना जन्म दिला. पण मजहरशी लग्न करणं ही देखील एक चूक होती, असं झीनत यांनी म्हटलं. नुकताच झीनत यांनी एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे दुसऱ्या लग्नातील अडचणींबद्दल सांगितलं.’गवाही’चं चित्रीकरण 1988 मध्ये झाले, माझा पहिला मुलागा, अझानच्या जन्मानंतर दोन वर्षांनी आणि माझ्या दुसऱ्या मुलाच्या, जहानच्या, गर्भारपणाच्या अगदी आधी.”

‘माझं आयुष्य असं झालं होतं ती, घरातील सुख फक्त एका फोटोपर्यंत मर्यादित राहिलं होतं. करियरच्या शिखरावर असताना लग्न आणि मातृत्व माझ्या वाट्याला आलं होतं. पण वैवाहिक आयुष्यात तडे यायला सुरुवात झालेली… अशात मी माझ्या आईसोबत राहण्यास सुरुवात केली. त्यानंतर अचानक दरवाजाची बेल वाजली. निर्माता विवेक वासवानी यांनी मला नवीन संधी दिली…’. आता झीनत अमान सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. आजही त्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.